लोकांचा प्रतिसाद पाहून भारावलोय : बाबू कवळेकर Dainik Gomantak
गोवा

लोकांचा प्रतिसाद पाहून भारावलोय : बाबू कवळेकर

कवळेकर इग्रामळ येथे प्रचारावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर प्रचारात सहभागी झाले.

दैनिक गोमन्तक

केपे: केपे मतदारसंघातील लोकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून मी भारावून गेल्याचे उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी सांगितले. आज इग्रामळ येथे प्रचारावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर प्रचारात सहभागी झाले होते.

केपे (Quepem) पालिका क्षेत्रात ख्रिस्ती मतदारांची संख्या मोठी असल्याने ही मते भाजपकडे न जाता काँग्रेसकडे जाणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे गणित आहे. पण आपण प्रचारासाठी फिरताना प्रत्येक घरातील व्यक्ती आमच्यासोबत जोडली जात आहे. ते पाहता लोकांचे आभार कसे व्यक्त करावे हे मला समजत नाही असे कवळेकर (Babu Kavalekar) म्‍हणाले. भाजपने सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. विकास करताना अथवा योजना चालीस लावताना कोणताच भेदभाव न केल्याने लोकांचा विश्वास भाजपवर बसला आहे. यासाठी सर्व जाती-धर्मांचे लोक आपल्याबरोबर जोडले जात असल्याचे त्‍यांनी सांगितले.

माजी नगरसेवक कामिलो सिमॉईश म्‍हणाले की, कवळेकर हे पाचव्यांदा निवडून येणार आहे यात कोणतेच दुमत नाही. त्‍यांनी केपेत अनेक विकासकामे केली असून लोकांचा त्यांना उदंड पाठिंबा मिळत आहे. ख्रिस्ती मतदार यावेळी भाजपबरोबर राहणार असून काँग्रेस (Congress) पक्षाचे अस्तित्व संपल्यातच जमा आहे, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election Result 2025 Live Update: फेर मतमोजणीतून देखील भाजपच्या पदरी निराशा; दवर्लीत काँग्रेस उमेदवारच विजयी

Goa Tourism: 'पर्यटनावर हडफडे दुर्घटनेचे सावट नाही; परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ', मंत्री खवंटेंचा मोठा खुलासा

Altinho Lyceum Complex: आल्तिनो येथील ऐतिहासिक लायसियम संकुल ‘जैसे थे’! मध्यस्थी केंद्र स्थापन करण्याची याचिका फेटाळली

Canacona: कृषी खात्याच्या प्रयत्नांना यश! काणकोणात वाढले भाजी पिकाचे क्षेत्र; प्रायोगिक तत्त्वावर 12 शेतकऱ्यांना फायदा

Christmas In Goa: गोव्यात पूर्वी 'ख्रिसमस'चे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी गाव एकत्र येत असे, कडाक्याच्या थंडीतील परिचित उब

SCROLL FOR NEXT