calangute  dainik gomantak
गोवा

जिप्सीच्या बोनेटवर बसून हैद्राबादच्या तरूणाची स्टंटबाजी, कळंगुट पोलिसांनी फाडले 'तालांव'

कळंगुटमधून एक व्हायरल व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली आहे.

Pramod Yadav

गोव्यात येणारे पर्यटक जीवघेणे स्टंट करण्यासह वाहतूकीचे नियम देखील खुलेआम मोडताना दिसतात. अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. बीचवर वाहन घेऊन जाणे असो की, रस्त्यावर स्टंट करणे असो गोवा पोलिसांनी वारंवार अशा घटनांविरोधात सक्त कारवाई केली आहे. तसेच, अशा गोष्टींना राज्यात वाव दिला जाणार नसल्याची सक्त ताकीद देखील दिली आहे.

दरम्यान, कळंगुटमधून एक व्हायरल व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश परवाना धारक एक जिप्सी कार कळंगुट मुख्य रस्त्यावरून जाताना दिसत आहे. या जिप्सीवर एक तरूण बोनेटवर बसला असून इतरजण गाडीत बसलेले दिसत आहेत. स्थानिकांनी त्यांना हात दाखवत फोटोची विनंती केल्याचे भासवत व्हिडिओ चित्रित केला. दरम्यान, हाच व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.

स्थानिकांनी यावेळी तरूणांना गावाचे नाव विचारले असता, त्यांनी हैद्राबाद असे सांगितले. पोलिसांनी तात्काळ या व्हिडिओ दखल घेत, कारवाई केली.

कळंगुट पोलिसांनी तात्काळ या वाहनाचा शोध घेऊन संबधित वाहन चालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. कळंगुट वाहतूक पोलिसांनी विविध गुन्हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वीस हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलिसांनी जिप्सी वाहन देखील जप्त केले असून, या कारवाईचा अहवाल न्यायालयाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, उत्तर गोवा पोलिसांनी या घटनेचा हवाला देत अशा प्रकारच्या कृत्यांची अजिबात गय केली जाणार नाही असे म्हटले आहे. कायदा आणि प्रशासन तुम्ही केलेल्या चुकीच्या कृतीविरोधात कायदेशीर कारवाई करेल असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT