Hyderabad youth gone missing in goa, Goa Crime News updates, Hyderabad Man Missing in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातून बेपत्ता, तेलंगणात घरी पोचलेल्या तरुणाच्या अंगावर संशयास्पद खुणा

तरुण काहीही बोलण्यास तयार नसल्याची कुटुंबीयांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या तरुणासोबत संशयास्पद घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा तरुण गोव्यात फिरण्यासाठी आला होता. मात्र अचानक बेपत्ताही झाला होता. जेव्हा हा तरुण तेलंगणातील आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या अंगावर संशयास्पद खुणा सापडल्याचं बोललं जात आहे. (Goa Crime News updates)

हैदराबादचा (Hyderabad) हा तरुण मार्चमध्ये काही लोकांसोबत पर्यटनासाठी गोव्यात आला होता. मात्र अचानक बेपत्ताही झाला होता. तरुण बेपत्ता झाल्याचं पाहून त्याच्या कुटुंबीयांनी गोवा गाठलं आणि तरुणाचा शोध घेतला होता. मात्र खूप शोधूनही तरुण न सापडल्याने कुटुंबीयांनी हणजूण पोलीस (Police) स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती.

दरम्यान श्रीनिवास नावाचा हा तरुण बोरबांदा येथील आपल्या घरी स्वत:हून परतला. मात्र त्याच्या अंगावर संशयास्पद खुणाही सापडल्या आहेत. हा तरुण घाबरलेल्या अवस्थेत घरी परतला असून काहीही बोलण्यास तयार नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्याच्यासोबत काय झालंय याबाबत त्यालाही माहिती नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्याचे किडनीसारखे अवयव चोरल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंब गोवा पोलिसांकडून (Goa Police) काही माहिती मिळते का याची वाट पाहात असून पोलिसांनी मात्र कोणतीही तक्रारच नोंद नसल्याचं सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT