Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हैदराबाद-गोवा कनेक्शन! तेलंगणा पोलिसांनी केला ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश; गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

Hyderabad Drug Trafficking: ड्रग्ज तक्रारीसंदर्भात हैदराबाद व गोवा कनेक्शन असल्याचे अनेकदा ड्रग्जमाफिया व विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईतून उघड झाले आहे.

Sameer Panditrao

पणजी: ड्रग्ज तक्रारीसंदर्भात हैदराबाद व गोवा कनेक्शन असल्याचे अनेकदा ड्रग्जमाफिया व विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईतून उघड झाले आहे. हैदराबाद पोलिसांनी गोव्यातून ड्रग्ज तस्करीप्रकरणी हैदराबादमध्ये एका तरुणाला अटक केली होती.

याची चौकशी करताना ड्रग्ज तस्करी व हवाला व्यवहाराच्या रॅकेटचा तेलंगणा अंमलीपदार्थविरोधी कक्ष व गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या संयुक्त कारवाईने पर्दाफाश केला आहे. गोव्यात कारवाई करताना तेलंगणा पोलिसांनी सुमारे ५० लाखांची रोकड वॉशिंग मशीनमधून जप्त केली. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

हैदराबाद पोलिसांनी नायजेरियन नागरिक इमॅन्यूएल बेदियाचो ऊर्फ मॅक्सवेल याला ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याच्याकडे कोकेन व एमडीएमएससारखे १.२५ कोटींचे ड्रग्ज सापडले होते. तो गेल्या दशकापासून गोव्यात येऊन किमती ड्रग्जची विक्री करत होता. हे ड्रग्ज तो गोव्यासह इतर राज्यांतही पाठवत होता. तो इतर नायजेरियन नागरिकांच्याही संपर्कात होता. गोव्यातून ड्रग्ज कुरिअर मार्गाने ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात असे. त्यामुळे या ड्रग्ज विक्रेत्यांच्या ग्राहकांची यादीही पोलिसांनी मिळवून त्यावर पाळत ठेवली होती.

मोबाईल दुकानाच्या मालकाला अटक

हैदराबाद पोलिस गोव्याशी संपर्कात असलेल्या नायजेरियन नागरिकांची तसेच ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळवत आहेत. या ड्रग्ज विक्रीतून हवालामार्गे रोख रक्कम पाठवण्याचे काम करणाऱ्या एका मोबाईल दुकानाच्या मालकालाही हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे जमा झालेल्या ५० लाखांची माहिती मिळाल्यावर ही कारवाई केली होती.

हवालाद्वारे पैशांचा व्यवहार

या हवालामध्ये पैशांचा व्यवहार करणारे ऐकमेकांना ओळखत नाहीत, मात्र त्यांच्या कोडिंगद्वारे त्याचा व्यवहार होतो. हे पैसे परदेशात पाठविले जातात. ड्रग्ज तस्करीतून जमा केलेल्या पैशांच्या हवालाचे नेटवर्क देशभर आहे. हैदराबाद पोलिसांनी उत्तम सिंग याच्यासह तिघांना अटक करून तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT