Drug Dealer Dainik Gomantak
गोवा

Big Drug Dealer: देशातील ड्रग्ज विक्रीचे जाळे गोव्यातून सक्रिय

ड्रग्सचा व्यापार करण्यासाठी केला जातोय सोशल मीडियाचा वापर

दैनिक गोमन्तक

सध्या देशभर गाजत असलेल्या अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणात गोव्यातील अंमली पदार्थांचा मुद्या पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील नायजेरियन तरुणांकडून याचा मोठ्या प्रमाणात व्यापार होतो आहे. (Hyderabad Police Commissioner said Big drug dealers of the country have shifted base to Goa)

याबाबत आता हैदराबाद पोलीस आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी गोव्यातील ड्रग्ज विक्रीचे जाळे किती सखोल आहे. यावर भाष्यं केले आहे. ते म्हणाले की, देशातील मोठमोठे ड्रग्ज विक्रेते गोव्यात स्थलांतरित झाले आहेत. येथूनच त्यांनी आपल्या हालचाली सूरु केल्या आहेत. तसेच हे विक्रेते ड्रग्सचा व्यापार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत ग्राहकांशी संपर्क साधत आपले व्यवहार करत असल्याचे ही यावेळी हैदराबाद पोलिसांनी म्हटले आहे.

हैदराबाद पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना माहिती देताना असे ही म्हटले आहे की, ही साखळी हैदराबादमधील ड्रग लॉबीशी संधान साधून आहे. यातील काही सराईतवर अटकेची कारवाई करण्यात आले आहे. तसेच तेलंगणासह देशाच्या इतर भागात पुरवठा येथूनच केला जातो आहे. यासाठी गोवा पोलिसांनी आम्हाला अधिक सकार्य करावे असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.

गोव्यात सक्रिय असलेल्या अमली पदार्थ पुरवणाऱ्या साखळीला गोव्यातून होणार्‍या मोठ्या पुरवठ्यामूळे या व्यापाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे भारतातील ड्रग्ज विक्रीतील सर्वात मोठे पेडलर गोव्यात कसे वळले आहेत. याला गोवा पोलीसांकडून अटकाव घालणे आवश्यक आहे. असे ही ते म्हणाले आहेत. त्यामूळे गोवा पोलीस यावर काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT