Hyderabad Police Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case : हिलटॉप क्लबचा मालक स्टीव्ह डिसोझाला हैदराबाद पोलिसांकडून अटक

गोव्यात ड्रग्ज तस्करीमध्ये गुंतलेल्यांची नावे समोर आल्याने हैदराबाद पोलिसांचं पथक गोव्यात आले होते. आता मोठा मासा गळाला लागल्याने त्याचा रिमांड मागून घेत पथक परत हैदराबादला रवाना होणार आहे.

विलास महाडिक

Goa Drugs : हिलटॉप नाईट क्लब मालक स्टीव्ह डिसोझा याला ड्रग्ज तस्करीप्रकरणी हैदराबाद पोलिस पथकाकडून अटक करण्यात आली आहे. आज दुपारी म्हापसा न्यायालयात त्याला ट्रान्झिट वॉरंट घेऊन हैद्राबादला पथक रवाना होणार आहे. गेल्या सोमवारपासून हे हैदराबाद पोलिसांचं पथक गोव्यात तळ ठोकून होते.

हैदराबाद पोलिसांची नजर कर्लिस बीच शॅक चालक एडविन नुनीस याच्यावरही होती पण हैदराबाद न्यायालयाने नुनिसने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर अटक न करण्याचा अंतरिम आदेश दिल्याने त्याला अटक करणे मुष्किलीचे बनले आहे. हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणात गोव्यात ड्रग्ज तस्करीमध्ये गुंतलेल्यांची नावे समोर आल्याने हे पथक गोव्यात आले होते. आता एक मोठा मासा गळाला लागल्याने त्याचा रिमांड मागून घेत हे पथक परत हैदराबादला रवाना होणार आहे.

काही दलाल गोव्यातून तेलगंणात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा संशय हैदराबाद पोलिसांना आहे. याप्रकरणी तेथील पोलिसांनी हणजुण येथील एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासासाठी हैदराबाद पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक राज्यात दोन दिवसांच्या भेटीवर आले होतं. अटकेत असलेला ‘कर्लिस’चा चालक एडविन नुनीस याचीही ते चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हिलटॉप नाईट क्लब मालक स्टीव्ह डिसोझा याला अटक करुन हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

गोव्यात सोमवारी आलेल्या हैदराबाद पोलिस पथकाने राज्याचे पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांची भेट घेऊन घेतली. तेलगंणा व गोवा या राज्यांमधील ड्रग्ज दलाल-विक्रेते यांचे रॅकेट यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे निरीक्षकांशी चर्चा करून ड्रग्जसंदर्भात माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी अमलीविरोधी कक्षाने म्हापसा बसस्थानकाजवळ हैदराबादच्या तरुणाला दोन किलो गांजासह अटक केली होती.

त्याने हा गांजा हैदराबाद येथून गोव्यात आणला होता. हैद्राबाद पोलिस पथकाच्या अधीक्षकांनी या संशयिताशी चौकशी केली व त्याने हैद्राबादमधून गांजा कोठून आणला त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गोव्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हैदराबादमध्ये येत असल्याचा तेथील पोलिसांनी कांगावा केला होता. त्यांनी हैदराबादमध्ये नोंद केलेल्या ड्रग्ज प्रकरणांत गोव्यातील सुमारे दिडशेहून अधिक नावे त्यामध्ये नोंदविली आहेत. त्यातील एक प्रितेश बोरकर याला घेऊन इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना त्यात यश आलेले नाही. दरम्यान, एडविन नुनीस याचे नाव हैद्राबाद पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यात असल्याच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामिनासाठी हैद्राबाद न्यायालयात अर्ज केला आहे.

आरोप-प्रत्यारोपाचे वारे शमले

कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल होत असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला होता व त्याचा चालक एडविन नुनीस ड्रग्ज प्रकरणामध्ये असल्याचे नमूद करून गोवा पोलिस त्याला पाठिशी घालत असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे गोवा-हैदराबाद पोलिसांमध्ये या ड्रग्ज प्रकरणावरून ठिणगी उडाली होती. या प्रकरणाला पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले होते. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या आरोपांचे खंडन करून गोवा पोलिसांनी उत्तर दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हे आरोप - प्रत्यारोपाचे वारे शमले आहे. हैदराबाद पोलिस त्यावर पांघरूण घालण्यासाठी तसेच गोव्यात अटक केलेल्या हैद्राबादच्या ड्रग्ज विक्रेत्याकडून माहिती मिळवण्यासाठी गोव्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT