Mopa  Dainik Gomantak
गोवा

मोपामध्ये रस्त्यासाठी सरकारनेच केली फळझाडांची कत्तल

दैनिक गोमन्तक

मोपा: मोपा येथील रोडसाठी जमीन मोकळी करण्यात आली असुन काजू, आंबा आदिसह तब्बल शेकडो फळझाडांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नुकसान झलेल्या शेतकऱ्यांनी (Farmer) तीव्र आक्षेप घेतला असुन देखील मोपा लिंकचे काम जोरात सुरू आहे.(Hundreds of fruitbearing trees have been bulldozed to clear land for Mopa link road by government)

यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वीच न्यायालयात धाव घेऊन लिंक रोडचे काम तातडीने थांबवण्याची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, राजकारण्यांच्या हस्तक्षेपासह अनेक कारणांमुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे.

"मोपा (Mopa) विमंतल पिडीत क्षेतकरी समितीचे अध्यक्ष संदिप कांबळी म्हणाले, "आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना वृक्षातोड थांबवण्यास सांगितले, दरम्यान त्यांनी आम्हाला न्यायालयाचा आदेश किंवा कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. तोपर्यंत काम सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही कोर्टात गेलो आहे. मात्र न्यायपालिका, सरकार (Goa Government) आणि राजकारणी या सर्वांचा या प्रकरणात असल्याचे जाणवत आहे. कारण हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे. गोवा जमीन अभिलेख फॉर्म 1 आणि 14 वर शेतकर्‍यांची नावे अजूनही अस्तित्वात आहेत. सरकार जे करत आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे." असे कांबळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले "आमची जमीन हडप करण्याचा हा डाव आहे. कोर्टाने या कामावर तात्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती आम्ही करतो, रस्ता मोकळा करण्यासाठी ते वृक्षतोड करत आहेत. त्यांना तसे करण्याचा कोणताही अधिकार नाही. वृक्षतोड करून जमीन मोकळी केली जात आहे आणि ते योग्य नाही. शुक्रवारी कामाला सुरुवात झाली, तेव्हापासून आम्ही त्यांना काम बंद करून स्थगिती आदेश काढण्यासाठी वेळ द्या, असे सांगत आहोत. मात्र एकही अधिकारी आमचे म्हणणे ऐकायला तयार नाही. ही संपूर्ण छळवणूक आहे,” असे मत पिडीत शेतकऱ्याने मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT