Goa Government | Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यातील तरुणांची नोकरीच्या नावाखाली तस्करी? मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा कारवाईचा इशारा

मानवी तस्करी ही आजची प्रमुख समस्या आहे; गोव्यातील काही तरुणांना कामाच्या नावाखाली इतर देशांमध्ये नेले जाते, मात्र प्रत्यक्षात त्यांची तस्करी केली जाते असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

दैनिक गोमन्तक

मानवी तस्करी ही आजची प्रमुख समस्या आहे; गोव्यातील काही तरुणांना कामाच्या नावाखाली इतर देशांमध्ये नेले जाते, मात्र प्रत्यक्षात त्यांची तस्करी केली जाते; काही लोक एजंटांमार्फत परदेशात नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपये भरले आहेत असा दावा करून माझ्याकडे आले आहेत; असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

(Human trafficking is a major problem today says CM Pramod Sawant)

काही लोक एजंटांमार्फत परदेशात नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपये भरतात नंतर इतर देशांमध्ये त्यांचा छळ केला जातो आणि काहींना अटक देखील केली जात असल्याचे त्यांनी सांगीतले; दरम्यान, पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये सक्रिय व्हावे आणि कोणी तक्रार करेपर्यंत थांबू नये असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिसांना केले.

'राज्यात मानवी तस्करी खपवून घेणार नाही'

गोव्यात लैंगिक कारणासाठी मानवी तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. लैंगिक तस्करीची 93 टक्के प्रकरणे राज्याबाहेरील असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात वेश्‍या व्यवसायासाठी मानवी तस्करीची परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांकडून पीडित-अनुकूल बचाव, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून पीडित-अनुकूल चौकशी आणि देहविक्री व्यवसायात अडकलेल्या महिलांसाठी ‘अन्यायरहीत जिंदगी’ या अशासकीय संघटनेकडून पर्यायी उपजीविकेची तरतूद अशा काही उत्तम पद्धती राज्यात राबविल्या जात आहेत.

या गोष्टींची इतर राज्यांतही अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे सावंत यांनी सांगितले.
लैंगिक तस्करी हा मुली आणि महिलांवरील हिंसाचाराचा सर्वांत वाईट प्रकार आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने देशांतर्गत आणि आंतरदेशीय तस्करी नियंत्रित करण्यासाठी उपाय योजणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी दिले.

- तस्करीबाबत संशोधन अहवाल सादर

राज्यातील लैंगिक तस्करी या विषयावर चर्चा करण्यासाठी सावंत यांनी 'अन्यायरहीत जिंदगी'चे संचालक अरुण पांडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी पांडे यांनी गोव्यातील तस्करीबाबत संशोधन अहवाल सादर केला. पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, गोवा हे लैंगिक तस्करीसाठी मुख्य गंतव्य राज्यांपैकी एक आहे. लैंगिक तस्करीशी लढा देत असताना संबंधित यंत्रणांसमोर येणाऱ्या आव्हानांबद्दलही पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT