Betoda Pollution Complaint Dainik Gomantak
गोवा

Betoda Pollution Complaint: बेतोड्यातील दुर्गंधीवर मानवाधिकार आयोगाची नजर; युनायटेड स्पिरिट्सवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश

Goa Industrial Pollution: बेतोडा येथील औद्योगिक युनिट्समधून पसरणारी दुर्गंधी आणि प्रदूषण यांसंदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेत मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा याचिका दाखल करून चौकशी पूर्ण केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बेतोडा येथील औद्योगिक युनिट्समधून पसरणारी दुर्गंधी आणि प्रदूषण यांसंदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेत मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा याचिका दाखल करून चौकशी पूर्ण केली आहे. दुर्गंधीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड’च्या परिसरावर सतत आणि सातत्याने लक्ष ठेवावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

मानवाधिकार संरक्षण कायदा, १९९३ च्या कलम १८(ई) नुसार चौकशी अहवाल शिफारसींसह संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून, ३० डिसेंबर २०२६ किंवा त्यापूर्वी केलेल्या किंवा प्रस्तावित कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. २३ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘बेतोडा येथील रहिवाशांची औद्योगिक युनिट्समधील दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे तक्रार’ या शीर्षकाच्या वृत्ताच्या आधारे आयोगाने ही स्वेच्छा कारवाई केली. मुख्य सचिव, आरोग्य सेवा संचालनालय, उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालय, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेतोडा-निरंकाल ग्रामपंचायत आणि फोंडा उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली होती.

आयोगाच्या आदेशानुसार...

आयोगाच्या आदेशानुसार सर्व प्रतिवादी आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत ५ ऑगस्ट, २३ सप्टेंबर आणि २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संयुक्त पाहणी करण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी पहिली पाहणी झाली. यामध्ये ‘युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड’ आणि ‘युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड’च्या परिसरात दुर्गंधी पसरल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ग्रामपंचायतीने ‘गोवा पंचायत राज कायद्या’च्या कलम ४७, ६४ आणि ७७ अन्वये युनिट्सना नोटीस बजावली. तसेच परिसरातील व नाल्यातील ईटीपी गाळ हटवून सांडपाणी व दुर्गंधीचा विसर्ग त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले.

२३ सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या पाहणीदरम्यान दोन्ही युनिट्सकडून बेतोडा नाल्यात कोणतेही सांडपाणी सोडले जात नसल्याचे आणि परिसरातील दुर्गंधी कमी झाल्याचे आढळले. युनिट्सच्या प्रतिनिधींनी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याची माहिती आयोगाला दिली, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ईटीपी व एसटीपीमधील प्रक्रियायुक्त पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Prices: पणजी, म्हापसा, कळंगुटमधील जमीन महागली; सरकारकडून 2026-27 चे किमान दर अधिसूचित

Panaji Traffic Management: नो-पार्किंग, पिकअप-ड्रॉप झोन अन् सीसीटीव्ही; पणजीतील वाहतुकीसाठी न्यायालयाचा ॲक्शन प्लॅन

खरी कुजबुज: कार्यकर्त्यांना तिकिटाची आस

Cricketer Attack: क्रिकेटपटूवर तलवारीने हल्ला; स्विमिंग पूलमध्ये बॉल गेल्याने वाद, 22 वर्षीय खेळाडू गंभीर जखमी

India South Africa Direct Flights: भारतातून दक्षिण आफ्रिकेला थेट विमानसेवा; 6 महिन्यांत सुरू करण्यासाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT