Rashmi Kashelkar news updates  Dainik Gomantak
गोवा

अनुभवांतूनच माणूस शिकतो: रश्मी कशेळकर

‘स्त्रीसंगम वंदेमातरम’ महिला मराठी संमेलन उत्साहात

दैनिक गोमन्तक

पणजी: जीवनात हरप्रकारचा अनुभव घेणे महत्त्वाचे असत, कारण अनुभवातूनच माणूस शिकत असतो, समृद्ध होत असतो. केवळ सुंदर गोष्टी बघून त्याबाबत व्यक्त होणे इथपर्यंत मर्यादित राहता कामा नये. कुरुपतेतही सौंदर्य शोधता आले पाहिजे. जीवनातील वेदनांचा अनुभव घेता आला, तरच त्या मांडता येतात, असे प्रतिपादन ललित लेखिका रश्मी कशेळकर यांनी येथे केले.

गोवा मराठी अकादमी आयोजित ''स्त्रीसंगम वंदेमातरम'' महिला मराठी संमेलनाच्या उद्‍घाटन समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी गोवा मराठी अकादमीच्या कार्यकारिणी सदस्या पौर्णिमा केरकर, सदस्य सचिव मंदार नाईक व अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत उपस्थित होते. (Rashmi Kashelkar News updates)

त्या पुढे म्हणाल्या, उत्तम लेखनासाठी ऐकण्याची कला अवगत असणेदेखील आवश्यक आहे. आपल्या भावना प्रत्येकवेळी व्यक्त करणे खूप गरजेचे असते. म्हणूनच तुम्ही निसर्गाशी, कागदांशी नाते जोडले पाहिजे. त्यांच्याजवळ व्यक्त झाले पाहिजे .

प्राचार्य सामंत यांनी यावेळी नकारात्मक विचारांना स्वतःपासून दूर ठेवले पाहिजे असे सांगितले. उद्‍घाटन समारंभानंतर झालेल्या परिसंवादात कशेळकर यांच्यासह समाज शिक्षण अभ्यासक सुमन सामंत सहभागी झाल्या होत्या.

प्रा. गीता गावस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. वेगळ्या वाटा या विषयावरील परिसंवादात दोन्ही वक्त्यांनी आपापले विचार मांडले. स्त्रियांवर परंपरेने येणारी बंधने त्यांनी बाजूला सारली पाहिजेत. त्यांनी नव्याने आपले अवकाश शोधले पाहिजे असा सूर परिसंवादात उमटला.तिसऱ्या सत्रात स्मरुनी गोमंतदेवी हा नृत्य, नाट्य, काव्य, गीत, संगीत, पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. पौर्णिमा केरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंदार नाईक यांनी आभारप्रदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT