Press Conference On Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादईसाठी 20 मे रोजी पणजीत मानवी साखळी; ‘सेव्ह गोवा सेव्ह म्हादई फ्रंट’चा पुढाकार

हेरिटेज ॲक्शन ग्रुप सक्रिय; विविध उपक्रम

दैनिक गोमन्तक डिजिटल

कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रयत्नांविरोधात आता ‘सेव्ह गोवा-सेव्ह म्हादई फ्रंट’च्या आंदोलनाला हेरिटेज ॲक्शन ग्रुपने पाठिंबा दर्शविला असून 20 मे रोजी पणजीत मानवी साखळीचे आयोजन केले आहे.

‘म्हादय आमची माय’ या फेस्टिव्‍हलचा हा भाग असेल, अशी माहिती प्रसिद्ध इतिहासतज्‍ज्ञ हेता पंडित यांनी आज दिली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

केंद्रीय जलआयोगाने कळसा-भांडुरा प्रकल्पाचे पाणी कर्नाटकात वळविण्यासाठी दिलेल्या डीपीआर मंजुरीनंतर राज्यभर असंतोष कायम आहे. त्यातच कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसने हे पाणी वळवण्यासाठी आमचे प्राधान्याचे प्रयत्न असतील असे जाहीर केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

सात किमी अंतर

‘सेव्ह गोवा-सेव्ह म्हादई फ्रंट’ आणि ‘हेरिटेज ॲक्शन ग्रुप’च्या वतीने 20 मे रोजी मानवी साखळीबरोबर विविध उपक्रम राबवले जातील. ही मानवी साखळी करंजाळे ते सांता मोनिका जेटी या सात किलोमीटर अंतरापर्यंत असेल.

विविध क्षेत्रांतील कलाकार, मच्छीमार, शेतकरी, कार्यकर्ते त्‍यात सहभागी होणार आहेत. कर्नाटकच्या विळख्यातून म्हादईला वाचविण्यासाठी सेव्ह गोवा, सेव्ह म्हादई चळवळीने आता पुढाकार घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT