Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak

Goa Rain Update : राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी; यलो अलर्ट जारी

यंदा मान्‍सूनपूर्व पाऊस अत्‍यल्‍प झाल्‍याने चिंता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे
Published on

सध्‍या वातावरणात वाढलेली आर्द्रता व उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. राज्‍यातील काही भागांत आज पाऊस झाला, तर मंगळवारी विजांच्‍या कडकडाटासह वादळी पावसाची शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

यंदा मान्‍सूनपूर्व पाऊस अत्‍यल्‍प झाल्‍याने चिंता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. धरणांची पातळीही कमी झाली आहे. दरवर्षी पावसाळा संपल्‍यानंतर काही महिन्‍यांच्‍या विलंबाने थोड्याफार प्रमाणात पाऊस होतो.

Goa Rain Update
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला

यंदा काहीच ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे; तर फेब्रुवारी व मार्च हे महिन्‍यांत गत 10 वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंद झाले. उष्‍णतेमुळे हैराण झालेल्‍या लोकांनाही पावसाची प्रतीक्षा आहे.

साकोर्डा, सत्तरीत सरी

तांबडीसुर्ला साकोर्डा भागात सोमवारी सायंकाळी ६.१५च्‍या सुमारास गडगडाट व विजांच्या लखलखाटासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा पसरला होता. त्यामुळे उष्म्याने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तसेच उशिरा सत्तरीत भागातही तुरळक पाऊस झाला. वीजपुरवठाही वारंवार खंडित होत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com