Polling During Portuguese Times In Goa Dainik Gomantak
गोवा

हिंदू आणि महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता; 200 वर्षापूर्वी पोर्तुगीज राजवटीत कशी व्हायची गोव्यात निवडणूक?

Pramod Yadav

Polling During Portuguese Times In Goa

भारतातील सार्वत्रिक निवडणुका देशातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. देशात प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आज मतदानाचा अधिकार आहे. पण, तब्बल 450 वर्षे पोर्तुगिजांच्या राजवटीखाली असलेल्या गोव्यात एकेकाळी प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार नव्हता.

त्यावेळी राज्यात हिंदूंना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक अटी पूर्ण कराव्या लागत. महिलांनाही मतदानाचा अधिकार नव्हता. चला तर जाणून घेऊया गोव्यातील पोर्तुगीज काळातील निवडणुकीचा रंजक इतिहास.

पोर्तुगीज राजवटीत 1821 मध्ये गोव्यात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. 1961 मध्ये गोवा स्वतंत्र होऊन भारतात सामील होईपर्यंत, फक्त 'विशेषाधिकारप्राप्त' नागरिकांनाच गोव्यात मतदानाचा अधिकार प्राप्त होता.

भारतात सामील होण्यापूर्वी गोव्यातील निवडणूक प्रक्रिया वेगळी होती. संसदीय निवडणुकीत उमेदवारांना इलिजिव्हिस आणि मतदारांना इलिटोरस संबोधले जात असे.

स्वातंत्र्यापूर्वी गोव्यात मतदानाची वयोमर्यादा 25 वर्षे होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुरुष मतदार विवाहित असणे बंधनकारक होते, तर महिलांना मतदान करण्याची परवानगी नव्हती.

द एन्काउंटर विथ द बॅलट इन कॉलोनियल गोवा: ए हिस्टोरिकल अँड ॲनॅलिटिकल स्टडी (1821-1961) या पुस्तकात शर्मिला पेस ई मार्टिन्स यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत गोव्याच्या निवडणूक पद्धतीची माहिती दिली आहे.

Sharmila Pais e Martins book ‘The Encounter with the Ballot in Colonial Goa (1821-1961): A Historical and Analytical Study’

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदाराचे किमान वय 25 वर्षे असणे बंधनकारक होते, परंतु उच्च शिक्षित मतदारासाठी 21 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. याशिवाय संसदीय निवडणूक लढवण्यासाठी देखील उच्च शिक्षणाची पदवी आवश्यक होती.

गोव्यात

1911 मध्ये हिंदूंना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला खरा मात्र, पोर्तुगीज भाषेचे ज्ञान नसल्याने अनेक हिंदूंना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. मतदानासाठी मतदाराला पोर्तुगीज भाषेचे ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले होते.

दरम्यान, पुढे 1918 मध्ये पोर्तुगीज भाषा (Portuguese Language) साक्षरता नियमन (Sebre Ler e Escraver) मागे घेण्यात आला. आणि 1945 नंतर पोर्तुगीज भारतात निवडणुका पुन्हा सुरू झाल्या तेव्हा तो कायम ठेवण्यात आला.

पोर्तुगीजकाळात मतदानासाठी साक्षरतेवर भर देण्यात आल्याचे दिसून येते, यात मतदाराला हस्तलिखित अर्जाद्वारे त्याची साक्षरता सिद्ध करावी लागत होती.

1852 ते 1895 पर्यंत उच्चभ्रू वर्गाव्यतिरिक्त, सामान्य लोक देखील गोव्याच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते. मात्र नंतरच्या अटी आणि शर्तींमुळे कधी मतदारांची संख्या वाढत गेली तर कधी कमी होत गेली. 1860 मध्ये गोव्यात 6,311 मतदार होते, जे 1865 मध्ये 3,708 इतके कमी झाले.

1878 मध्ये गोव्यात 17,469 मतदार होते जे 1894 मध्ये वाढून 74,621 झाले. 1917 मध्ये 14,624 आणि 1958 मध्ये 11,000 मतदारांची संख्या घटली. 2024 मध्ये 11,66,939 गोमन्तकीय लोकसभेसाठी मतदान (Goa Loksabha Voting) करतील. यात 5,65,628 पुरुष तर महिला मतदारांची संख्या 6,01,300 एवढी आहे. यात 11 तृतीयपंथी मतदार देखील आहेत.

1933 च्या पोर्तुगीज राज्यघटनेने प्रथमच माध्यमिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांना निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्षात 1961 पर्यंत गोव्यात महिलांनी मतदानच केले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT