Twitter Viral Idea Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पावसात अडकलाय, घरी कसं जाणार?, तरुणाने ट्विटरवर शेअर केली भन्नाट आयडिया

गोव्यातल्या तरुणाचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने धुळधाण उडवली आहे. वेळीअवेळी येणाऱ्या पावसाने सर्वसामान्य गोवेकरांचा अंदाजही चुकू लागला आहे. त्यामुळे अनेकजणांना पावसाचा अंदाज नसल्याने त्यांच्यावर कधी दुकानात, कधी ऑफिसमध्ये तर कधी हॉटेलमध्ये अडकून पडल्याची वेळ आली आहे. कधीतर गाडी नसल्यामुळे घरी कसं जायचं हा यक्षप्रश्न अनेक गोवेकरांसमोर, पर्यटकांसमोर पडला असेल. मात्र सध्या एका पठ्ठ्याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तरुणाने महागड्या गोव्यात स्वस्तात घरी कसं जायचं याची आयडियाच दिली आहे. नेटकऱ्यांनीही लागलीच या ट्विटला उचलून धरत त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

तरुणाने ट्विटरवर शेअर केलेली आयडिया तशी अगदी सहज आणि सोपी आहे. हॉटेलमध्ये अडकून पडल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे घरी जाण्यासाठी गाडीही नसते अशावेळी तुम्ही काय कराल? टॅक्सी कराल, किंवा भाड्याची गाडी करुन घरी जाण्याचा प्रयत्न कराल किंवा कुणालातरी बोलावून घ्याल. मात्र या सगळ्यासाठी होणारा खर्चही जास्तच आहे. मात्र या तरुणाने शेअर केलेली आयडिया भन्नाट तर आहेच मात्र तुमच्या खिशावर ताण न आणता तुम्हाला सुखरुप घरीही पोहोचवणारी आहे.

तरुणाने ट्विटमध्ये असं म्हटलंय की जर समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये भर पावसात अडकला असाल आणि घरी जाण्यासाठी तुमच्याकडे वाहन किंवा काही वाहतुकीचं साधन नसेल तर एक काम करा. महागडी कॅब मागवण्यापेक्षा तुम्ही ज्या हॉटेलमध्ये अडकला असाल त्याच हॉटेलमधून तुमच्या घरच्या पत्त्यावर स्विगी किंवा झोमॅटोवरुन जेवण मागवा. जेव्हा तुमचा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये पोहोचेल तेव्हा त्याला कॉल करुन त्याच्यासोबत घरी जा. खिशावर ताण आणणाऱ्या महागड्या कॅबऐवजी फुड डिलिव्हरीची ही स्वस्तातली युक्ती नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. गोव्यातल्या सुयश कामत नावाच्या तरुणाचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT