Mumbai Goa Highway 
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Mumbai Goa Highway: धोका चोरीमारी - लूट याचा धोका नाही पण रस्ताच एक स्कॅम आहे, आणि तोच धोका आहे, अशी प्रतिक्रिया एकाने दिलीय.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास म्हणजे एक प्रकारची कसरतच झाली आहे. खड्ड्यांमुळे महामार्गाची झालेली दुरावस्था, घाट रस्ता आणि सुमसान मार्ग यामुळे या मार्गावर प्रवासात नेहमीच आव्हाने असतात.

विशेषत: पावसाळ्यात मुंबई - गोवा महामार्गावरील अधिक खडतर होऊन जातो. रात्रीच्या वेळी या मार्गावरुन प्रवास करणे कितपत सुरक्षित आहे? याची माहिती काही नियमित प्रवाशांनी दिली आहे.

समाज माध्यमांवर पर्यटन, प्रवास याबाबत खुल्या चर्चा होत असतात. फेसबुकवर असणाऱ्या अशाच एका ट्रीपर्सच्या ग्रुपवर मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर विविध सदस्यांनी आणि या मार्गावरील नियमित प्रवाशांनी उत्तरे दिली आहेत.

मुंबई - गोवा महामार्ग रात्रीच्या प्रवासासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचे मत एका सदस्याने मांडले पण, आडमार्गावर काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सुमसान ठिकाणी किंवा अगदीच निर्मनुष्य ठिकाणी न थांबण्याची सूचना या सदस्याने केलीय.

या पोस्टवर अनेकांनी महामार्गावर रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सुरक्षिततेचा विचार करता रात्री अकरानंतर प्रवास न करण्याची सूचना अनेकांनी केलीय.

धोका चोरीमारी - लूट याचा धोका नाही पण रस्ताच एक स्कॅम आहे, आणि तोच धोका आहे, अशी एक प्रतिक्रिया या पोस्टवर एका सदस्याने केली आहे.

एकाने दोन महिन्यात या महामार्गावरुन तीनवेळा प्रवास केल्याचे सांगितले, यात कोणताही त्रास न झाल्याचे त्याने सांगितले. पण, महामार्गावर पंक्चरवाले, गॅरेज किंवा हॉटेल रात्रीच्या वेळेस उघडे भेटत नसल्याचे सांगितले. शिवाय घाटातून जपून जाण्याचा आणि कायम गुगल मॅप वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.

एका सदस्याने पर्यायी मार्ग देखील सुचवला. मुंबई - अटल सेतू मार्गे - चिरनेर मार्गे - खारपाडा पुलाजवळ किंवा अटल सेतू मार्गे पळस्पे मार्गे माणगाव - महाड - चिपळूण - संगमेश्वर - देवरुख - साखरपा - दाभोळे मार्गे वाटुळ येथे बाहेर पडून पुढे सावंतवाडी तसेच गोव्यापर्यंत प्रवास करू शकता, अशी प्रतिक्रिया या सदस्याने दिली.

दरम्यान, गेल्या १५ वर्षाहून अधिककाळापासून मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. दुरावस्थेमुळे या महामार्गावर अनेकांचे बळी गेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करुन देखील महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात. यामुळे या महामार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊम प्रवास करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT