Michael Lobo
Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

'कॉंग्रेसने अकार्यक्षम मानलेले मायकल लोबो आता कार्यक्षम कसे झाले?'

दैनिक गोमन्तक

पणजी: आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी बुधवारी काँग्रेसवर कडक ताशेरे ओढले. कॉंग्रेसने कळंगुटचे माजी आमदार मायकल लोबो यांना अकार्यक्षम मानले होते. मात्र, आता त्यांना ते कार्यक्षम वाटत असल्याची टीका त्यांनी केली. ‘कचरामंत्री’, असे म्हणत आधी काँग्रेसने (Congress) लोबोंना हिणवले होते. आता काँग्रेसने कचरा मंत्र्यांचा समावेश कोणत्या निकषावर केला, असा प्रश्‍न नाईक यांनी उपस्थित केला. (Goa Assembly Election 2022: AAP attacks Cong on Michael Joining Decision)

चिदंबरम यांनी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना वचन दिले होते की, काँग्रेस 80 टक्के नवीन चेहरे आणेल. आता काँग्रेसने तेच जुने चेहरे आणले आहेत.

कळंगुट उदध्वस्त करणारे मायकल लोबो (Michael Lobo) आता शिवोली संपवण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप कळंगुटचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी केला. काँग्रेस आणि भाजप (BJP) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी कधीही सामान्य लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी काम केले नाही. मात्र ‘आप’कडे गोव्याच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे, असे ते पुढे म्हणाले.

‘रात्रीस खेळ चाले’

भाजपप्रमाणे काँग्रेसनेही उशिरापर्यंत राजकारण खेळण्यास सुरुवात केली आहे. मायकल लोबो यांचा पराभव करण्याचा निर्धार काँग्रेस कळंगुट ब्लॉकने यापूर्वीच केला होता. त्याच पक्षाने आता एका महिन्याच्या आत लोबो यांना पक्षात घेतले. भाजप आणि काँग्रेस हे दोघेही गोवेकरांना दर्जेदार रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यासाठी लोकांचा रोष अनुभवत आहेत. अशा स्थितीत ते मतदानपूर्व सेटिंगमध्ये गुंतले आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : काँग्रेसपुढील ५० वर्षे केंद्रात सत्तेत येणे कठीण : मुख्यमंत्री

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

SCROLL FOR NEXT