covid vaccine
covid vaccine 
गोवा

गोव्यातील खासगी हॉस्पिटलकडे कोविड प्रतिबंधक लसी कशा?

दैनिक गोमंतक

पणजीः  राज्यात 18 ते 45  वर्षांखालील लोकांना लस (covid vaccine) देण्याचा निर्णय लसीचा साठा न मिळाल्याने सरकारने रद्द केला. मात्र, हीच लस या वयोगटासाठी एका खासगी  दवाखान्यात भरमसाट शुल्क आकारून दिली जात आहे. या लसी खासगी कशा मिळाल्या याचे भाजप वैद्यकीय विभाग अध्यक्ष असलेल्या डॉ. शेखर साळकर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.(How to get covid vaccine at a private hospital in Goa?) 

राज्यातील जनता कोविड संकटाने त्रस्त आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे लोकांचे जीव जात असताना भाजपचा वैद्यकीय विभाग मात्र समाजमाध्यमावर प्रसिद्धी मिळविण्यात व्यस्त आहे. वैयक्तिक प्रसिद्धी करून घेण्याची हौस असलेल्या या विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी जाहिरातबाजी बंद करून रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे. आज रुग्णांना वेळेत प्राणवायू, औषधे, खाटा व लसी मिळणे गरजेचे असून कोविडसंदर्भातच्या जाहिरातीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांची छायाचित्रे पाहण्यात कोणालाच रस नाही. आज आपली वैद्यक शास्त्राची लोकांना सेवा देण्याची जबाबदारी सोडून डॉ. साळकर हे जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहेत हे धक्कादायक व दुर्दैवी आहे. 

गोव्यात 18 ते 45  वर्षांच्या लोकांना 1 मे पासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय सरकारने लस उपलब्ध नसल्याने ऐनवेळी रद्द केला. केंद्र व अनेक राज्य सरकारे आज लस उपलब्ध करून घेण्यास धडपडत आहेत, परंतु गोव्यातील एका खासगी दवाखान्याने लसीकरण सुरू करून जे राज्य सरकारला शक्य झाले नाही ते त्यांनी सुरू करून सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांचा पर्दाफाश होत आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले.  

डॉ. शेखर साळकर यांनी भाजपची तळी उचलून धरण्याची एकही संधी सोडली नाही. चाचणी न करता सामाजिक सर्वेक्षण करणे, खासगी इस्पितळांतील खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव करणे अशा सरकारच्या चुकीच्या निर्णयांना साळकर यांनी  उघड पाठिंबा दिला, परंतु या निर्णयांचा काहीच फायदा झाला नाही. भाजपच्या वैद्यकीय विभागाशी संलग्न किती डॉक्टर आज प्रत्यक्ष कोविड रुग्णांना मदत करीत आहेत हे डॉ. साळकर यांनी लोकांना सांगावे. गोव्यात आज प्राणवायू, कोविड औषधे, खाटा यांचा किती साठा उपलब्ध आहे याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT