Goa Human Trafficking Dainik Gomantak
गोवा

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Goa Human Trafficking: मानवी तस्करीतील लोकांचे पुनर्वसन हा सर्वात महत्वाचा मुद्दा असल्याचे जसपाल सिंग म्हणाले.

Pramod Yadav

Goa Human Trafficking

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात होणाऱ्या मानवी तस्करीबाबत राज्याचे पोलिस महासंचालक जसपास सिंग यांनी माहिती दिली आहे. एका आयोजित कार्यशाळेत सिंग बोलत होते.

प्रामुख्याने नोकरीचे आमिष देऊन तरुण, तरुणींचा राज्यात तस्करी केली जाते असे, जसपाल सिंग म्हणाले. अशा प्रकारांना महिला अधिक बळी पडतात, असे सिंग म्हणाले.

अन्य राज्यातील गरजू, गरीब आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण, तरूणींना येथील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नोकरीचे आमिष दिले जाते. त्यातून तरुणींना बऱ्याचवेळा देहविक्रीच्या व्यवसायात गुंतवले जाते, असे जसपाल सिंग म्हणाले.

गोवा पर्यटन राज्य असल्याने अशा प्रकारच्या आमिषांना इतर राज्यातील गरजू तरुण, तरुणी बळी पडतात, अशी माहिती सिंग यांनी दिली.

गोव्यात दरवर्षी मानव तस्करीबाबत कार्यशाळा आयोजित केली जाते यातून राज्यात ही समस्या असल्याचे मान्य करुन त्यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा केली जाते, असेही सिंग म्हणाले.

मानवी तस्करीतील लोकांचे पुनर्वसन हा सर्वात महत्वाचा मुद्दा असल्याचे जसपाल सिंग म्हणाले. अशा लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचे अथवा रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्याचे आव्हान असते. गोव्यात अर्ज सामाजिक संस्था मदतीने पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करते, असे जसपाल सिंग म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT