मोरजी: कोरोना महामारीचे संकट कायम असताना परराज्यातून गोव्यात पत्रादेवी नाक्यावरून दिवसाला किमान 400 ते 500 नागरिक प्रवेश करतात, 1 ऑगस्ट पासून ते आज पर्यंत ज्यांनी पत्रादेवी नाक्यावरून प्रवेश करून गोव्यात आले त्यातील ऐकाही व्यक्तीला कोरोना असल्याचा अहवाल मिळाला नाही, येणाऱ्या प्रवाश्याना दमा खोकला थंडी या सारखे आजार असतात त्यांचाही कोरोना अहवाल नकारात्मक येत आहे, त्यामुळे नक्कीच देशात कोरोना आहे तर येणाऱ्या सर्वच प्रवाशांचा अहवाल नकारात्मक कसा काय याविशाई संशय व्यक्त केला जात आहे.
पत्रादेवी चेक नाक्यावर दिवसाला 300 ते चारशी प्रवासी येतात कुणाकडे दोन डोस घेतलेले सर्टिफिकेट आहे, तर कुणी एक डोस घेतला त्याना आरोग्य तपासणी करावी लागते. या ठिकाणी व्हिक्टर अपोलो आणि आरोग्य लॅब अश्या दोन खाजगी आरोग्य विभागातून तपासणी केली जाते, एक अपोलो विभाग 250 रुपये घेतो, तर आरोग्य लेब 270 रुपये कोरोना तपासणीसाठी घेत असतात.
दोन्ही विभागाचे वेगवेगळ्या दर आकारात आहेत, जिथे 20 रुपये कमी तिथे रांगा आणि गर्दी जास्त आहे. या नाक्यावर आर्धादिवस प्रत्यक्ष जावून पाहणी केली तर हे चित्र दिसत होते, वारंवार पोलीस प्रवाशाना गरीत करू नका, रांगेत रहा, सुरक्षित अंतर ठेवा असे आवाहन करत होते, मात्र काही वेळात नियम पाळले परत येरे माझ्या मागल्या प्रमाणे व्हायचे.
गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक आहे खरी. पण जे चाचणी करुन येत नाही, त्यांची चेकपोस्टवर चाचणी केली जाते. असंख्य लोकं सध्या बसने किंवा खासगी वाहनांनी गोव्यात दाखल होत आहेत. पण एकही जण कोरोना पॉझिटिव्ह अद्याप आढळून न आल्यानंही आश्चर्यच व्यक्त केलं जातंय.पत्रादेवी चेकपोस्टवरुन गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली जातेय खरी. पण ही तपासणी खरोखरच होतेय, की तपसाणीच्या नावाखाली सोपस्कार पार पाडले जात आहेत, असा सवाल काहींनी उपस्थित केलाय.
बसने किंवा खासगी वाहनांमधून मोठ्या संख्येनं गोव्यात लोक दाखल होत आहेत. पत्रादेवी चेकपोस्टवर तपासणीसाठी लागलेल्या रांगा, हेच अधोरेखित करत आहेत. पण या सगळ्यांची तपासणी होऊन अर्ध्या तासाच्या आत लोक गोव्याच्या दिशेने पुन्हा प्रवासाला लागत आहेत. एकूण चाचणी करुन आलेल्यांची चाचणी करण्यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवर लगबग पाहायला मिळतेय.
दरम्यान रोज असंख्य प्रवासी आता पुन्हा गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. खासगी बसची वाहतूकही वाढल्याचं दिसून आलंय. या बसेसमधून मर्यादित प्रवाशांच्या घेऊन येणाऱ्यांची चाचणी पत्रादेवी चेकपोस्टवर होते. तपासणी केल्यानंतर या बस पुन्हा आपल्या मार्गाला लागतात. दरम्यान, मजूर असतील, प्रवासी असतील, यांचं गोव्यात येण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. मात्र नियमांचं खरोखरत किती गांभीर्यानं पालन केलं जातंय, यावरुही शंका उपस्थित केली जातेय.
12 तास कर्मचाऱ्यांनाही जुमले
सरकारी कर्मचाऱ्याला केवळ आठ तास ड्युटी असते मात्र पेडणे उपजिल्हाधिकारी राविशेखर निपाणीकर यांच्या आदेशानुसार या नाक्यावर काही स्कूलमधील शिक्षक व क्लार्क याना या नाक्यावर 12 तास सेवा देण्यासाठी कार्यरत केले आहे, त्यात 58 वर्षाच्या एका शिक्षकालाही तब्बल 12 तास उभे राहून नाक्यावर सेवा द्यावी लागते, शिवाय या कर्मचाऱ्यांना वेगळे केबिन नाही, एकाच केबिन मध्ये दोन्ही आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना टेस्ट करतात आणि त्यात हेही कर्मचारी आपली सेवा बजावत असतात, एखाद्यावेळी एखादा प्रवासी जर कोरोना बाधित आढळला तर यःही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू शकते. विशेष म्हणजे या नाक्यावर उपजिल्हाधिकारी कार्यालयातून कर्मचाऱ्यांना आपली स्वत:ची वाहने घेवून पंचवीस ते 30 किलोमीटर ये जा करावी लागते .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.