Goa CM Pramod Sawant during Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Bhumiputra Bill: मुख्यमंत्र्यांचा फोलपणा उघड

निवडणुकीसाठीचे गाजर दाखवत गोवेकरांना मूर्ख बनवण्याच्या हेतूने हे विधेयक घाईघाईने मंजूर केले, अशी टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) भूमिपुत्र (Bhumiputra) अधिकारिणी विधेयकाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्यावर जोरदार टीका झाली. संपूर्ण गोवा या विधेयकाबाबत असमाधानी होते. विरोधकांशी कोणतीही चर्चा न करता आणि निवडणुकीसाठीचे गाजर दाखवत गोवेकरांना मूर्ख बनवण्याच्या हेतूने हे विधेयक घाईघाईने मंजूर केले, अशी टीका आम आदमी पक्षाने (AAP) केली आहे. (How Bhumiputra Bill was passed without discussion in Assembly)

मुख्यमंत्र्यांनी आताच हे विधेयक रद्द करणे, यावरून अनेक गोष्टी सिद्ध होतात. सध्याच्या या विधेयकाचे स्वरूप कोणाच्याही फायद्याचे नसून आमदार आणि त्यांच्या मित्रांच्या फायद्यासाठी आहे. सावंत यांनी असा कायदा करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू नये, कारण ते कोणत्याही गोवेकरांच्या हिताचे नाही. जर गोवेकरांचा आवाज इतका महत्त्वाचा होता, तर विधानसभेत चर्चा न करता हे विधेयक कसे मंजूर झाले? सार्वजनिक आक्रोशानंतरच लोकांचा विचार केला पाहिजे का? भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांची माहिती नाही का? विधेयकाचे नाव बदलण्यासारख्या स्टंटमध्ये सहभागी होण्याऐवजी भाजपने आपला फोलपणा ओळखला पाहिजे आणि संपूर्णपणे विधेयक रद्द केले पाहिजे. विधेयक मंजूर होण्याआधी नव्हे, तर नंतर विधेयकावर चर्चा केली जाते, हे हास्यास्पद आहे. विशेषत: ते इतक्या घाईघाईने आणि लोकशाही पद्धतीने मंजूर करणे ही जनतेची थट्टा आहे, असे ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

भाजप सरकारने मंजूर केलेले हे विधेयक फक्त एक नौटंकी आहे. जेव्हा आम आदमी पक्षाचे सरकार येईल, तेव्हा सर्व धोरणे लोकांच्या विश्वासाने बनवली जातील आणि याचा फायदा सर्व लोकांना होईल. गोवा म्हणजे फक्त काही आमदार आणि त्यांचे मित्र नाहीत. गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्ती आणि प्रामाणिक हेतूची. पण प्रमोद सावंत हे जुमला करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका म्हांबरे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

SCROLL FOR NEXT