Goa Flood Effects Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: मागच्या पुरात कोसळलेली घरं अजूनही उभी राहीली नाहीत

मुख्यमंत्री निधीतून केवळ एक लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळाले, मात्र कोसळलेल्या घरावर मात्र आज पर्यंत घर उभे राहू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

मोरजी: धो-धो पडत असलेल्या पावसाला साथ मिळाली ती तीळारी प्रकल्पाचे पाणी सोडल्याची , या पाण्यामुळे जबरदस्त धोका पेडणे तालुक्यातील शापोरा नदीला महापूर येवून हा हा कार माजवला होता अनेक घरे पाण्याखाली गेली अनेक लोक बेघर झाले तात्पुरती सोय केली तरी घटनास्थळी आपत्कालीन सेवा शाशकीय यंत्रणा वेळेवर पोहचू शकली नाही हि नाराजी तालुक्यातून जे पुरात सापडले होते त्याना गरज होती ते मदतीकडे पाहत होते. (Houses that collapsed in the previous floods are still lying)

मात्र, सरकारची वाट न पाहता स्थानिकांनी वारा पावसाची पर्वा न करता इब्रामपूर येथील देवेंद्र मडकर यांचे 25 पेक्षा जास्त सदस्य राहत असलेले घर पूर्णपणे जमीन दोस्त होवून 50 पन्नास लाखाची नुकसानी झाली होती त्याला दोन वर्षे पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री निधीतून केवळ एक लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळाले, मात्र कोसळलेल्या घरावर मात्र आज पर्यंत घर उभे राहू शकले नाही .

काही सदस्यांनी दुसरीकडे घर बंडाळी मात्र ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे त्याना मात्र आजही आसऱ्या साठी वणवण करावी लागते. देवेंद्र मडकर कुटुंबीयापैकी एकाने त्याच घराच्या बाजूला एक खोली बांधली आणि घरसंसार सुरु केला.

Goa Flood Effects

यंदाही नुकसानाची पुनरावृत्ती

मडकर कुटुंबियांचे दोन वर्षापूर्वी घरत कोसळले हि घटना ताजी असतानाच 22 रोजी त्याही लहान असलेल्या खोली पुराचे ढोपरभर पाणी शिरून होत्याचे नव्हते झाले. स्थानिक सोडून कुणीही मदतीला आले नाही, सरकारी यंत्रणा अजूनपर्यंत पोचली नाही, केवळ तलाठी आला एक दोन प्रश्न विचारला आणि पंचायतीत बोलावले, त्या पलीकडे अजूनही काहीही मदत नाही.

मिशन फॉर लोकलची मदत

मडकर कुटुंबाची त्याच दिवशी भेट घेवून मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी त्याना लागणारे कडधान्य लगेच वितरीत केले. त्याच्या समस्या जाणून घेतल्या. श्री. मडकर यांनी प्रतिक्रिया देताना देताना मागच्या दोन वर्षापूर्वी घर कोसळले त्यावेळी अनेक नेते मंडळी आले आणि आश्वासन देव्बून गेले, सरकारमार्फत केवळ 1 लाख रुपये मदत मिळाली, कुटुंब संख्या मोठी आहे, काही सदस्यांनी इतरत्र घरे उभारली परंतु आपली स्थिती तशी नाही, एका लाखाने घर कसे उभारणार, आणि कुटुंब सदस्य संख्या जास्त असल्याने एक लाख मिळालेली मदत तशीच बँक मध्ये पडून आहे किती सदस्यना या एक लाख रुपयातून काय मिळणार म्हणून ती बँक मधून रक्कम काढली नाही. आपण एक खोली काडून त्या ठिकाणी राहतो, परंतु यंदाही पूर्ण घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने दाखल घ्यावी; राजन कोरगावकर

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी मडकर यांचे दोन वर्षापूर्वी घर कोसळले त्याची पाहणी करून सरकारने आजपर्यंत हे घर उभारण्यासाठी कोणत्याच हालचाली न केल्याने नाराजी व्यक्त करून निदान आता तरी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून मडकर कुटुंबियाना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

Goa Flood Effects

सरपंच म्हणतात कल्पनाच दिली नाही

इब्रामपूर सरपंच सोनाली इब्रामपूरकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना तिच्या चेहऱ्यावर भयाचे सावट स्पस्ट दिसत होते प्रथम नागरिक सरपंच असल्याने गावात आलेला प्रसंग भयानक होता, ती या विषयी बोलताना म्हणाली कि तिळारीचे पाणी सोडण्यापूर्वी गावाला किंवा पंचायतीला कळवायला हवे होते. पूर्व कल्पना दिली असती तर आम्ही जागृती करून लोकाना पूर्वीच हलवले असते. काही स्थानिकांनी वेळेचे भान न पाहता काही जणाना हलवले, त्याची गुरेही हलवण्यात आली, मात्र काहीच्या घरात पाणी शिरल्याने विजेची उपकरणे हलवता आली नाही त्यामुळे लाखो रुपये नुकसानी झाली.

लोकांची शेती गेली, बागायती गेल्या दुध वाया गेले, शेतकऱ्याना त्वरित मदत कार्य करण्याची गरज आहे, शेती पूर्ण गेली त्याना आता मदत मिळाली तर तो परत शेतीकडे लक्ष देवू शकतो अन्यथा शक्य नाही.

शांताराम शिरोडकर यांनी प्रतिक्रिया देताना गावात अचानक पाणी आल्याने रस्त्यावर ठेवलीले वाहने पाण्यात गेली, लोक भयभीत झाले, सरकारी यंत्रणेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांनी आपले मतभेद विसरून मदत कार्य सुरु केले, नुकसानी जवळ जवळ करोडो रुपये झाले त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. घरांचे नुकसान झाले, शेती बगायती गेल्या, पुरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहे. तिळारीचे पाणी पूर्व कल्पना देवून सोडवायला हवी, तसे केले असते तर लोक सावध राहिले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT