Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News: 'त्या' कुटुंबाला मिळणार हक्कच छपर, सभापतींच्या संकल्पनेला काणकोण वासियांचा प्रतिसाद

श्रम-धाम योजनेतून साकारतंय घरकुल

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News सभापती रमेश तवडकर यांनी आज काणकोण गावडोंग्री येथील भाटू वेळीप यांची भेट घेतली. श्रम-धाम या योजनेतून वेळीप यांच्या नवीन घराच्या बांधकामाचा शुभारंभ उद्या होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज सभापतींनी वेळीप यांची भेट घेतली.

गोव्याला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष पूर्ण होऊनही एखादे कुटुंब घराविना असणे हे योग्य नाही. गरिबातल्या गरिबाकडे देखील स्वतःचे घर असावे हा निर्धार करून सभापती तवडकर यांनी हि योजना सुरु केली.

प्रत्येकाने स्वतःला जमेल तशी आर्थिक आणि शारीरिक मदत करून गरजूंच्या डोक्यावर छप्पर उभारणे हाच या संकल्पनेचा मूळ गाभा. 25 फेब्रुवारीला या योजनेचा अधिकृत शुभारंभ झाला.

काणकोणमध्ये अंदाजे 14 घरं या योजनेच्या माध्यमातून उभारली जात आहेत. खोतीगाव येथे याच योजनेच्या माध्यमातून एक घर उभारले गेले आहे.

माणुसकी आणि ग्रामव्यवस्था अबाधित राहणे हाच शुद्ध हेतू ठेऊन ही योजना सुरु केली असल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले आहे. लोकसहभागातून अशी कामे होत असून आपली जुनी ग्रामव्यवस्था या निमित्ताने टिकून राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

'ऑस्ट्रेलियात आम्ही भांडी घासली!' लाहोरमध्ये पोहोचताच पाकिस्तानी कर्णधारानं मांडली व्यथा; पाकड्यांचा निलाजरेपणा पुन्हा जगासमोर उघड

"सर प्लीज गेट उघडा, माझ्या करिअरचा प्रश्न...!" 10 मिनिटांच्या उशिरामुळे हुकली परीक्षा; हताश विद्यार्थिनीनं ट्रेनमधून उडी मारुन संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT