Atal Ashray Yojana : घर दुरुस्तीसाठी 16 लाभार्थ्यांना ‘अटल आश्रय’ चा हात

भुईपाल प्रभाग क्र. 9 : आमदार दिव्या राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप
Distribution of approval letters by MLA Divya Rane
Distribution of approval letters by MLA Divya RaneGomantak Digital Team
Published on
Updated on

पिसुर्ले : होंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या भुईपाल गावातील प्रभाग क्रमांक 9 मधील एकूण 16 धनगर समाजबांधवांना सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अटल आश्रय घर दुरुस्ती योजनेचा लाभ झाला आहे.

2013 साली सुरू झालेल्या या योजनेचा अद्याप येथील एकाही नागरिकाला लाभ मिळाला नव्हता. या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मंजुरी पत्रांचे वाटप गुरुवार, 30 रोजी पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते पणजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले.

Distribution of approval letters by MLA Divya Rane
Pension scheme : पेन्शन योजना कायमस्वरूपी केल्याबद्दल खलाशी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार

भुईपाल गावात प्रभाग क्रमांक 9 मध्ये ओबीसीमध्ये येणाऱ्या धनगर समाजाची अधिक लोकवस्ती आहे. त्यामुळे या प्रभागाच्या पंचसदस्य स्मिता मोटे यांनी या भागाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रभागातील बऱ्याच समाजबांधवांचे अर्ज भरून गटविकास कार्यालयातर्फे समाजकल्याण खात्याकडे पाठविले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात एकूण 16 जणांच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत घर दुरुस्ती करण्यासाठी सरकार दीड लाख रुपयांची मदत करीत आहे.

Distribution of approval letters by MLA Divya Rane
Government Scheme: सरकारचा मोठा निर्णय, SCSS, सुकन्या योजनासह लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ

आतापर्यंत या प्रभागातील 45 जणांचे अर्ज भरून पंचायतीच्या माध्यमातून समाजकल्याण खात्याकडे पाठविले होते. त्यामधील पहिल्या टप्प्यात 16 लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. इतर लाभार्थींना आमदार डॉ दिव्या राणे यांच्या सहकार्याने या योजनेचा फायदा मिळणार आहे.

- स्मिता मोटे, पंच, प्रभाग क्रमांक 9

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com