Regulations for Tenants Dainik Gomantak
गोवा

Regulations for Tenants: घर, हॉटेल मालकांनी भाडेकरूंची नोंद करावी

भाडेकरार आवश्‍यक ः दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पोलिस तपासणी हवीच

Ganeshprasad Gogate

Regulations for Tenants Living in Goa: गोव्यात अलीकडे परराज्यातील लोकांचा विविध गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे घर, फ्लॅट भाड्याने देताना योग्य कागदपत्रे हवीच. आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करावी.

बाहेरच्या नागरिकांचे पोलिस तपासणी पत्र आवश्यक असून त्यांची पोलिसांत नोंद करावी, असे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.

धडक मोहिमेत अनेकजण विना भाडेकरार व कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे दिसून आले आहे. भाडेकरू - घरमालकांत भाडेकरार करणे आवश्‍यक आहे.

याच पार्श्वभूमीवर आता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मालमत्ता धारकांना तेथे राहणाऱ्या लोकांचा भाडे करार करण्याची सूचना केली आहे.

काहीजण गुन्हे करण्याच्या उद्देशाने राज्यात राहतात. गुन्हा करून फरार होतात. कोणत्याही प्रकारची नोंदणी नसल्याने त्यांची माहिती मिळवणे कठीण जाते, यामुळे तपासात अनेक अडचणी येतात.

त्यामुळे बाहेरून राज्यात येऊन भाडे पद्धतीवर राहणाऱ्या लोकांची नोंदणी होणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या संबंधित माहिती मिळवणे प्रशासनाला देखील सोपे जाते. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी भाडेकरार संबंधित सूचना जारी केली आहे.

दक्षिण गोव्यातील घर, इमारत, फ्लॅट धारक, हॉटेल-लॉजिंग-बोर्डिंग, शॅक, खासगी गेस्ट हाऊस, पेईंग गेस्ट या ठिकाणी भाडे करारावर राहणाऱ्या लोकांची भाडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी मतदान कार्ड, चालक परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट अशा कागदपत्रांची माहिती घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

हॉटेल-लॉजिंग-बोर्डिंग धारकांनी भाडेकरूंची माहिती सरकारच्या पथिक सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करण्याची व्यवस्था करावी. संबंधित भाडेकरूची माहिती परिक्षेत्रातील पोलिस स्टेशनला दिल्याशिवाय भाडेकरू ठेवू नये सक्त ताकीद आदेशात देण्यात आली आहे.

विशेष निर्देश

हॉटेल्स, इमारती, फ्लॅट्स यांच्या व इतर निवासी व्यवस्था करणाऱ्या मालकांना आणि लॉजिंग व बोर्डिंग, शॅक्स, खासगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट निवास, धार्मिक संस्थांचे पेइंग गेस्ट निवास यांच्या मालकांना, तात्पुरती निवास व्यवस्था करणाऱ्या मालकांना आपल्याकडे येणाऱ्या या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकांकडून मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांची मागणी करावी, असे निर्देश दिले आहेत.

‘एटीएम’साठी सुरक्षा रक्षक

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या ‘एटीएम’साठी सुरक्षा रक्षक आणि त्या परिसरात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे. आदेश 6 मार्चपासून पुढील साठ दिवसांसाठी लागू राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर ‘भादंसं’च्या 188 कलमाअतंर्गत कारवाई केली जाणार असल्याचे या आदेशात सूचित केले आहे.

आवश्‍यक सूचना

  • घराच्या/मालमत्तेच्या मालकांनी भाडेकरूंचे सदर तपशील संबंधित भागाच्या पोलीस प्रमुखाला दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणतीही जागा निवासासाठी देऊ नये.

  • राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

  • आदेश 6 मार्च पासून लागू झाला असून तो 60 दिवसांच्या कालावधीसाठी अस्तित्वात राहील.

  • आदेशाचे उल्लंघन भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत दंडनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT