पिसुर्ले देऊळवाडा येथे कोसळले घर Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पिसुर्लेत घर कोसळले, पावसाचा तडाखा कायम

घर कोसळून पडल्याने लाखोचे नुकसान होताना त्यांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात येणाऱ्या देऊळवाडा प्रभातील हरीजन वाड्यावरील अनुराधा अंकुश परवार या महीलेचे घर पडले. जोरदार पडणाऱ्या पावसाच्या तडाख्याने आज सकाळी हे घर कोसळून पडल्याने लाखोचे नुकसान होताना त्यांना बेघर होण्याची पाळी आली आहे. (House collapsed due to rain In Goa)

या संबंधी वाड्यावरील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ परवार यांनी सांगितले की गेल्या दोन दिवसांपासून येथे जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे आज सकाळच्या दरम्यान अनुराधा अंकुश परवार या महीलेच्या घराचा एका बाजूचा भाग संपूर्ण कोसळून घरातील भांडी, कपडे, जेवणाचे समान व घरातील इतर साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली चिरडून बरेच नुकसान झाले आहे.

सुदैवाने सदर घटना दिवसा घडली, नाही तर रात्रीच्या वेळी घडल्यास नक्कीच जीवीत हानी झाली असती. सदर घरात अनुराधा परवार तसेच तीची मुलगी या दोघी राहत होती. या घटनेची कल्पना स्थानिक पंच तथा सरपंच जयश्री परब यांना दिल्या नंतर सदर घरांच पाहणी करून शक्यतो मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सोमनाथ परवार यांनी सांगितले.

सदर घराचा एक भाग कोसळल्याने इतर भाग ही तेथे राहण्यासाठी असुरक्षित बनला आहे, त्यामुळे त्यांना आपल्या घरी राहण्याची व्यवस्था केली आहे, या प्रकरणी सरकारने त्वरित दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेल्या महिला व तीच्या मुलीला आसरा निर्माण करून देण्यासाठी मदत करावी अशी मागणी यावेळी सोमनाथ परवार यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT