Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire : बेतालभाटी येथे घराला आग लागून 10 लाखांचे नुकसान

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र आगीचा बंब पोहोचण्यापूर्वीच लोकांनी ती आटोक्यात आणली.

सुशांत कुंकळयेकर

Goa Fire : नागवाडो बेतालभाटी येथे काल रात्री एका घराला आग लागून 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मोहित गोडबोले यांच्या मालकीचे हे घर असून रात्री या घरातून अचानक धूर येत असल्याचे पाहिल्यावर शेजारच्या लोकांनी जवळ येऊन पाहिले तर घराने पेट घेतला होता.

या आगीत सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती घरमालकाने दिली. ही आग नेमकी कशी लागली त्याची माहिती मिळू शकली नाही. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र आगीचा बंब पोहोचण्यापूर्वीच लोकांनी ती आटोक्यात आणली.

दरम्यान नवीन वर्षाची सुरुवातच आगीच्या घटनांनी झाली आहे. चाररस्ता-करासवाडा, म्हापसा येथील एका जनरल स्टोर दुकानास आग लागल्याने 70 हजारांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून म्हापसा अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली.

दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.2) रात्री 10.53 च्या सुमारास या आगीबाबत दलास माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पाण्याच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत हे गाळेवजा दुकान जळाले व दुकानामधील माल सुद्धा जळाला. या आगीत बिस्कीटचे पुडे, अगरबत्ती, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या तसेच इतर मालाचे नुकसान झाले.

आगीमुळे माल व दुकान पकडून जवळपास दोन लाखांचे आपले नुकसान झाल्याचा दावा दुकान मालक दिनेश हरमलकर यांनी केला. तर म्हापसा अग्निशमन दलाने 70 हजार नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT