Hotel's of Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: हॉटेले खुली करण्यास मिळणार परवानगी

गोव्यातील (Goa) सिनेमा थिएटर, जलतरण तलाव, कसिनो हे मात्र बंदच राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील हॉटेले व रेस्टॉरंटना 50 टक्के क्षमतेने ग्राहक घेऊन ती खुली करण्याची परवानगी देण्याचा विचार सरकारने चालवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तसे सुतोवाच आज केले आहे. राज्यातील संचारबंदी सोमवार ता. 5 रोजी सकाळी 7 वाजता संपणार होती. ती आता 12 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा काल केली आहे. ही संचारबंदी वाढवताना यापूर्वी दुकाने, बाजार, आस्थापने यांना संध्याकाळी 3 वाजेपर्यंत उघडण्याची जी परवानगी होती त्यात वाढ करून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्याचसोबत आत्तापर्यंत बंद असलेली सलून व उघड्यावरील क्रीडा संकुले खोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Hotels and restaurants in Goa have been allowed to open at 50 per cent capacity)

सिनेमा थिएटर, जलतरण तलाव, कसिनो हे मात्र बंदच राहणार आहेत. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरेंटचालकांनी मुख्यमंत्र्याकडे हॉटेल रेस्टॉरेट उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून 50 टक्के ग्राहक घेऊन हॉटेले व रेस्टॉरेंट उघडण्याची परवानगी देण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT