Police arrested accused Dainik gomantak
गोवा

Crime News : सांगोल्डा चोरीप्रकरणी हॉटेल कामगारास अटक

चोरीची घटना 24डिसेंबर रोजी घडली होती

दैनिक गोमन्तक डिजिटल

Crime News : सांगोल्डा येथील एका रिसॉर्टमधून 45 हजारांची रोकड तसेच एक दुचाकी मिळून एकूण 85 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी साळगाव पोलिसांनी सांतू बबलू दास (झारखंड) या संशयित हॉटेल कामगारास अटक केली.

चोरीची घटना 24डिसेंबर रोजी घडली होती. संशयित आविनो व्हिला रिसॉर्टमध्ये कामाला होता. संशयिताने रिसॉर्टच्या रिसेप्शन काऊंटरमधील 45हजार रुपये आणि रिसॉर्टबाहेर उभी केलेली अ‍ॅक्टिवा (जीए 03- एसी 1897) दुचाकी घेऊन पळ काढला होता.

हा चोरीचा प्रकार समजल्यानंतर हॉटेलमालक पारस आगरवाल यांनी साळगाव पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता, संशयित आपल्या मूळ गावी झारखंडला गेल्याची माहिती उघडकीस आली होती.

यावेळी कुंकळ्ळी पोलिस पथक झारखंडमध्ये होते. या पथकाला साळगाव पोलिसांनी संशयिताची माहिती पुरवली. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी संशयितास दुचाकीसह पकडून साळगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्यानंतर पोलिसांनी संशयितास रितसर अटक केली. पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

Viral Video: आधी ट्रेनची काच लखलखीत, मग रुळावर 'ती' कृती... तरूणीचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात

Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

SCROLL FOR NEXT