police  Dainik Gomantak
गोवा

बेसुमार दर अकारणीच्या कारणामुळे झाले वादंग

सांगोल्डा येथील हॉटेल मालक, पोलिसांत वादावादी

दैनिक गोमन्तक

पणजी: सांगोल्डा येथील किस्मूर- वाईन- डायन - लेझ या हॉटेलमध्ये मंगळवारी साडेसात ते साडेआठ या दरम्यान आठ पोलिस कर्मचारी जेवण व मद्यपानासाठी आले होते. बाजारभावापेक्षा या हॉटेलमधील जेवणाचे दर अधिक असल्याचे कारण देत हॉटेल मालकाशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे.

(Hotel owner in Sangolda, dispute with police)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हॉटेलमध्ये वास्को येथील तीन, वाहतूक खात्यातील दोघे, कंळगुट व अंजुणा येथील प्रत्येकी एक व मडगावमधील एक असे आठ पोलिस साडेसात ते साडेआठच्या दरम्यान सांगोल्डा येथील किस्मूर- वाईन- डायन - लेझ या हॉटेलमध्ये आले होते. गटारी अमावास्या लागण्यापूर्वी कोटा पूर्ण करण्यासाठी सुरवातीला मद्य व चकणा घेतला. लहरीप्रमाणे ऑर्डर दिल्या गेल्या. नंतर जेवणासाठी रोटी, चिकन, पुलाव, वैगेरेची ऑर्डर देऊन जेवणावर ताव मारला. बाजारभावापेक्षा या हॉटेलचे दर जास्त असल्याचा बनाव करून वाद सुरू केला. इतर ठिकाणी बिअरचे दर कमी असताना तुम्ही जास्त दर का आकारता? असे विचारले असता आमचे दर मेनूकार्डप्रमाणे असल्याचे वेटरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे हॉटेल मालक नातेवाईक असल्याचे समजते.

वाहनांच्या नंबर प्लेटवरून काढला माग

हॉटेल मालकाच्या कर्मचाऱ्यांनी वाद घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनांचे क्रमांकांचे फोटो काढले होते. या फोटोवरून त्यांचा माग काढण्यात आला. साळगावचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्याशी हॉटेल मालकाने संपर्क साधला असता, यासंदर्भात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून, शिवीगाळ केल्यामुळे अदखलपात्र तक्रारीची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

SCROLL FOR NEXT