Vasco News Dainik Gomantak
गोवा

Vasco News: मुरगावातील सर्वच रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

संकल्प आमोणकर ः सकारात्मकतेवर भर

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगावातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागामार्फत सुरू असून, यात भविष्यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली.

मुरगाव सडा, जेटी, देस्तेरो , बायणा व इतर भागातील सर्व अंतर्गत रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागा तर्फे अंदाजे 7 कोटी रुपये खर्चून मुरगावातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण सुरू आहे.

सडा येथील सरकारी विद्यालयाकडून अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमोणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेवक दामू कासकर, नगरसेविका मृणाली पार्सेकर, श्रद्धा आमोणकर, माजी नगरसेवक रमाकांत कुडपकर, अविनाश नाईक, विशांत नाईक, महेश नाईक व इतर स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आपले फक्त विकासावर लक्ष’

गेल्या आठवड्यात राज्य नगरविकास विभागाच्या राज्य नगरविकास संस्था(सुडा) तर्फे वास्कोत मासळी मार्केट व बायणा येथे व्यावसायिक इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात आमदार संकल्प आमोणकर यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते याविषयी ते म्हणाले, की राज्याच्या विकासात कोणीही अडथळा निर्माण करू नये. प्रत्येकाने नकारात्मक विचार सोडून, सकारात्मक विचाराने कार्य करावे. मला का बोलाविण्यात आले नाही, याचा विचार करण्यापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित करणे मला गरजेचे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT