'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातर्फे भारतीय सैनिकांचा सन्मान  Dainik Gomantak
गोवा

'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातर्फे भारतीय सैनिकांचा सन्मान

सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करण्याचे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

वास्को : भारतीय सैनिकांनी जनतेच्या सेवेसाठी सर्वकाही त्याग केले असल्याने त्यांना, 'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रम राबवून त्यांचा सन्मान केला असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी दिली. तसेच प्रत्येकाने देशसेवेसाठी आपला पुढाकार दाखवल्यास त्याचे फळ निश्चित प्राप्त होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वास्को नॉन येथील श्री शैनेश्र्वर भजनी सांस्कृतिक संस्थेच्या 66 व्या वर्धापन दिनी चिखली येथील गोवा शिपयार्ड भवनमध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ सभासद नरेंद्र वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापक संचालक कोमोडोर बी.बी.नागपाल, संस्थेचे अध्यक्ष धनंजय वेंगुर्लेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र आर्लेकर म्हणाले की, भारतीय सीमेवर आपले सर्वस्व त्याग करून सेवा बजावणाऱ्या सैनिकांसाठी आपण काहीतरी करावे, हेच ध्येय ठेवून चैतन्य संस्थेच्या सहकार्याने 'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रम राबवून एक प्रकारे देश सेवा करण्याचे प्रयत्न केले असून त्यात प्रत्येकाने आपला सहभाग दाखवून देश सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.

सीमेवरील सैनिकासाठी चांगले काहीतरी करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध योजना राबविल्या असून त्यात मलासुद्धा सामावून घेऊन देशसेवा करण्याची संधी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी संरक्षण क्षेत्रात विविध योजना सैनिकांसाठी राबवून देश सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. त्याच भावनेने प्रत्येक भारतीयाने देश सेवेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT