Honda  Dainik Gomantak
गोवा

Honda News : होंड्यात वीज उपकेंद्र उभारणीचा मार्ग मोकळा; ग्रामसभेत ठरावाला मंजुरी

Honda News : होंडा आमदार दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना लाभले यश

गोमन्तक डिजिटल टीम

Honda News : पिसुर्ले, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नांतून होंडा येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित वीज उपकेंद्राला पंचायतीच्या मालकीची जमीन देण्याच्या ठरावाला अखेर मंजुरी मिळाली.

त्यामुळे वीज उपकेंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, या संबंधीचा ठराव रविवार, ७ रोजी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

या पंचायत क्षेत्रातील वीज समस्या संपुष्टात आणण्यासाठी आमदार डॉ.दिव्या राणे यांनी विशेष लक्ष घालून वीज उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता, मात्र सदर केंद्र उभारण्यासाठी सुमारे ५ हजार चौ.मी. जागेची गरज असल्याने हे केंद्र कुठे उभारावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे होंडा पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत या प्रकल्पाला मान्यता दिल्याने हा प्रश्न संपुष्टात आला आहे.

या पंचायत क्षेत्रात वीज उपकेंद्र उभारण्याचा प्रस्तावाबाबत पंचायत सचिव मुला वरक यांनी ग्रामसभेत दिली, त्यानंतर साधक बाधक चर्चा करून शेवटी भिमराव राणे व बी. डी. मोटे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी सरपंच शिवदास माडकर, पंच स्मिता मोटे, निलिमा शेट्ये, कृष्णा गावकर, सुशांत राणे, प्रमोद गावडे, नीलेश सातार्डेकर, दीपक गावकर, पंचायत सचिव मुला वरक, तर बीडीओतर्फे निरीक्षक म्हणून दिनेश माईणकर हे अधिकारी उपस्थित होते.

सदर प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील वीज समस्या संपुष्टात येईल.सध्याचे वीज उपकेंद्र हे वाळपईत आहे. त्यामुळे वेळ व पैसा खर्च करून वाळपईला जावे लागते. या भागात वीज उपकेंद्र झाल्यास सर्व सुविधा इथेच उपलब्ध होणार आहेत.

- डॉ. दिव्या राणे,आमदार-पर्ये

पाणीप्रश्‍न सोडवा !

ग्रामसभेत उपस्थित महिलांनी ओवळिये गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नळाला पाणी येत नाही, तर टॅंकर द्वारे होणारा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT