Holy Spirit Feast In Margao Dainik Gomantak
गोवा

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Holy Spirit Feast: फेस्त फेरीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी काल दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Holy Spirit Feast In Margao: मडगाव येथील जुन्या बाजारातील होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताला सुरवात झाली. फेस्त फेरीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी काल दिली. यंदा फेस्त फेरी सात दिवसांपेक्षा जास्त वेळ नसणार आहे. फेस्त फेरी १९ ते २५ मे दरम्यान असेल व २६ रोजी सर्व स्टॉलधारकांना आपले स्टॉल रिकामे करावे लागतील.

शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस स्टॉल देण्याचे काम सुरू झाले. यंदा ३५१ स्टॉलधारकांची व्यवस्था केली असून सात दिवसांसाठी प्रत्येक स्टॉलकडून ९,६०० रुपये शुल्क आकारले जाईल. यात २४२ रुपये प्रत्येक दिवसासाठी सोपो शुल्क, ६०० रुपये कचरा शुल्क व १८ टक्के जीएसटीचा समावेश आहे. गेल्या वर्षी प्रत्येक स्टॉलधारकाकडून प्रत्येक दिवसासाठी ७७० रुपये शुल्क आकारले होते.

यंदा त्यात १० टक्के म्हणजे ७७ रुपये जादा आकारले जात आहेत. गत दोन वर्षांपासून मडगाव नगरपालिकेला फेस्त फेरीतून ३५ लाख रुपयांचा महसूल मिळालेला आहे. यंदाही ३५ लाख रुपये महसुलाचे लक्ष्य असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. गत सोमवारी मडगाव पालिकेत फेस्त फेरीच्या तयारीसाठी सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यात काही मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात आली. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने जे नियम घालून दिले आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन यावेळी केले जाईल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

स्टॉल्स, पार्किंगसाठी जागा निश्र्चित

यंदा फेस्त फेरीसाठीचा प्लॅन तयार करण्यात आला असून स्टॉल्ससाठी, पार्किंगसाठी जागा निश्र्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बायो टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची, वीजपुरवठ्याची, सीसीटीव्ही, कंट्रोल रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. वॉच टॉवर तयार केला असून तिथे आरोग्य सेवा व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

‘एसजीपीडीए’ला महसूल नाही

यंदा फर्निचरचे स्टॉल्स एसजीपीडीए मैदानावर नसून जिल्हा न्यायालय इमारतीच्या बाजूला असलेल्या जागी घालण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आम्हाला फेस्त फेरीतून महसूल मिळणार नसल्याचे एसजीपीडीएचे अध्यक्ष आणि वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी सांगितले. एसजीपीडीए मैदानावर राष्ट्रीय रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT