Holi  Dainik Gomantak
गोवा

वास्कोत गुलालोत्सवाची धूम, शहरात भव्य मिरवणूक

वास्को शहरात मुरगाव शिगमोत्सव समितीर्फे गुलालोत्सव साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव शिमगोत्सव समितीतर्फे गुलालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. वास्कोत श्री दामोदर चरणी गुलाल वाहील्यानंतर गुलालोत्सव म्यूझीक, बँडबाजा, ऑर्केष्ट्राने वास्को शहरात मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. नागरीकांनी गाण्यांच्या हिंदोळ्यावर नाच गाण्यात सहभाग दर्शविला. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसेच प्रत्येक वाड्यावर लहान मुलांबरोबर महीलांमध्येही उत्साह दिसून आला.

वर्ष पद्धती प्रमाणे वास्को (Vasco) शहरात मुरगाव शिगमोत्सव समितीर्फे गुलालोत्सव साजरा केला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे कार्यक्रमात खंड पडला होता. यंदा कोरोनाचे (Coronavirus) संकट दूर होऊन उसंत मिळाल्याने मुरगाव तालुक्याबरोबर वास्को शहरात धुलीवंदन पाहण्यास मिळाले. यात लहान मुलांपासून अबाल वृध्दांपर्यत नागरीकांनी आपला सहभाग दर्शवून धुवंदनाच्या कार्यक्रमात मौजमजा केली.

सकाळी येथील ग्रामदैवत श्री दामोदर चरणी गुलाल वाहील्यानंतर मुरगाव शिमगोत्सव समितीतर्फे धुळीवंदनाला सुरुवात केली. वास्कोचे नवनिर्वाचीत आमदार दाजी साळकर तसेच मूरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही धुलीवंदनात आपला सहभाग दर्शवीला. यावेळेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोहीतामार्फत श्रीचरणी गान्हाणे घातल्यानंतर धुलीवंदनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर ट्रकावर ऑर्केष्ट्राच्या नाच गाण्यावर वाजत गाजत मिरवणूकीला सुरुवात झाली. मिरवणूक श्री दामोदर मंदिराकडून सेंट अ‍ॅण्ड्रयू चर्च, एफ एल गोम्स मार्गावरून पालिकेसमोर, नंतर रेल्वे स्थानकाकडे मिरवणूकीची सांगता झाली. यात शेकडो नागरीकांनी भाग घेऊन यंदाची होळी (Holi) धुलीवंदन उत्साहात साजरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

Verna Fire: भंगारअड्ड्याच्या मालकाचे सर्व आरोप खोटे, शरीफ कोणतेही भाडे देत नसल्याचा जुझे कुटुंबीयांचा दावा

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

Uterine Cancer: राज्यात 'एचपीव्‍ही'मुळे दरमहा आठ महिलांना गर्भाशय कॅन्‍सर, 5 वर्षांत 527 रुग्‍ण

SCROLL FOR NEXT