Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa: कुंकळ्ळीतील लढ्याच्या इतिहासाचा विपर्यास निषेधार्ह

युरी : स्वातंत्र्यसैनिकांप्रति प्रचंड अनास्था

दैनिक गोमन्तक

मडगाव: ‘आझादी का अमृत महोत्सव’ प्रदर्शनात कुंकळ्ळीतील चीफटेन्स विद्रोहाच्या इतिहासाचा केलेला विपर्यास आणि पत्रादेवी हुतात्मा स्मारकाकडे जाणाऱ्या कदंब बसच्या बिघाडामुळे अडकलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती दाखवलेली असंवेदनशीलता यांमुळे आपला गौरवशाली इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांप्रती भाजप सरकारचा उद्धटपणा उघड होतो, असा आरोप कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केला आहे.

(History of the struggle in Goa)

गोवा सरकारतर्फे आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ प्रदर्शनात कुंकळ्ळी लढ्याच्या इतिहासाच्या माहितीतील विपर्यासावर चीफटेन्स मेमोरियल ट्रस्टने घेतलेल्या आक्षेपाशी आमदार युरी आलेमाव यांनी पूर्ण सहमती व्यक्त केली.

पत्रादेवीला जाताना कदंब बसच्या बिघाडामुळे पर्वरी येथे अडकून पडलेल्या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारच्या अक्षम्य कृत्याचा मी तीव्र निषेध करतो, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

‘इंडिया शायनिंग’ची पुनरावृत्ती

‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ हे भाजप सरकारचे प्रसिद्धी स्टंट एकप्रकारे भाजपवरच उलटले आहेत. भाजपचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबद्दलचा अनादर अनेकदा उघड झाला आहे. भाजपचे हे दोन्ही उपक्रम म्हणजे 2004 च्या भाजप सरकारच्या ‘इंडिया शायनिंग’ मोहिमेची पुनरावृत्ती आहे. ज्याप्रमाणे 2004 मध्ये भाजपचा अनपेक्षितपणे पराभव झाला, तेच आता 2024 मध्ये घडणार आहे, असेही युरी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT