Partition Horrors Remembrance Day
पणजी: देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानला त्यांचा देश केवळ मुस्लिम राष्ट्र व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे तिथे हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यावर अत्याचार करण्यात आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे फाळणीच्या काळात बलिदान दिलेल्यांची देखील स्मरण करायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कंदब बस स्थानकात विभाजन – विभिषिका स्मृती दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे गुरुवारी (१४ ऑगस्ट) मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्धाटन झाले. यावेळी सावंत बोलत होते.
“देशाचे स्वातंत्र्य आपल्याला फुकट मिळालेले नाही. यासाठी कित्येक स्वातंत्र्यवीरांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि भारत अशा दोन देशांची निर्मिती झाली. फाळणीच्या काळात अनेक याताना नागरिकांना सोसाव्या लागल्या, याची आठवण म्हणून फाळणी स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो,” असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
“पाकिस्तानमधून भारतात येताना नागरिकांना अनेक वेदना आणि त्रास सहन करावा लागाला. ७५ वर्षापूर्वी पाकिस्तानातील नागरिकांना त्यांचा देश पूर्णपणे मुस्लिम देश हवा होता. त्यासाठी त्यांनी तेथील हिंदू, ख्रिश्चन नागरिकांवर अत्याचार केला. या घटनेची आठवण राहावी यासाठी विभाजन – विभिषिका स्मृती दिवस किंवा फाळणी दिन साजरा केला जातो,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
“विभाजन – विभिषिका स्मृती दिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जुन पाहावे आणि त्याचा अनुभव घ्यावा. फाळणीच्या वेदनांची जाणीव राहावी,” असे सावंत यांनी नमूद केले. स्वातंत्र्य “सैनिकांचे बलिदानाचे ज्याप्रमाणे आपण स्मरण करतो त्याचप्रमाणे फाळणीत देखील ज्यांनी बलिदान दिले त्यांची देखील स्मरण करायला हवे,” असे सावंत म्हणाले.
“फाळणीच्या दरम्यान भारतात आलेल्या अनेकांनी नागरिकत्वचा न्याय मिळाला नव्हता पण, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात घेतलेल्या निणर्यामुळे त्यांना नागरिकत्वाचा हक्क मिळाला,” असेही सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.