55th International Film Festival of India 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 55व्या इफ्फीत गोवा पोलीस ऑर्केस्ट्रा सादर करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

इफ्फीतील हिमाचल पोलिसांच्या ऑर्केस्ट्रावर मुख्यमंत्री खूष

दैनिक गोमन्तक

55th International Film Festival of India 2023

यशवंत पाटील

54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर झालेल्या समारोप सोहळ्यात हिमाचल प्रदेशच्या सिमला हेडक्वाटर्सच्या पोलीस पथकाने सादर केलेल्या ऑर्केस्ट्रावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत खूपच खूष झाले.

यावेळी त्यांनी खास स्टेजवर जाऊन या पोलिसांचे कौतुक केलेच, शिवाय पुढील वर्षीच्या इफ्फीत गोवा पोलीस ऑर्केस्ट्रा सादर करतील, अशी घोषणाच करून टाकली आणि उपस्थित गोवा पोलीस अवाक् झाले. आतापासूनच आम्हाला तयारीला लागावेल लागेल, अशी चर्चाही यावेळी त्यांच्यात सुरू झाली. (Himachal Pradesh Police's orchestra in IFFI)

हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी यावेळी देशक्तीपर गीते सादर करून उपस्थित सिनेरसिकच नव्हे, तर देशासह जगभरातून आलेल्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्वांच्या मनात देशभावना जागविल्या.

समारोप सोहळ्यानंतर हिमाचल प्रदेशमधून आलेल्या व पिळदार मिशा असलेल्या पोलिसांसोबत सेल्फी घेण्याचा अनेकांना मोह आवरला नाही. हिमाचल पोलिसांनीही व्यासपीठाच्या खालच्या आवारात उपस्थित राहून सेल्फी काढायला देऊन सिनेरसिकांच्या भावनांना दाद दिली. यावेळी उपस्थित समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही या पोलिसांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT