गोवा

महामार्ग गेला वाहून

Prakash Talvanekar

प्रकाश तळवणेकर

पेडणे :

अमेरे - पोरस्कडे येथे सोमवारी पहाटे चारपदरी महामार्गाचा सुमारे पंचवीस मीटर लांबीचा रस्ता संरक्षक भिंतीसह तेरेखोल नदीच्‍या पात्रात वाहून गेला व महामार्गाला मोठे भगदाड पडले. पहाटेची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या महामार्गाच्‍या ठिकाणी काही भागाला तडे गेले असून तो भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्‍यान, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी अधिकाऱ्यांसह दुपारी घटनास्‍थळाला भेट दिली व पाहणी केली. तसेच सुरक्षिततेच्‍यादृष्‍टीने उपाययोजना करून काम सुरू करण्याच्या सूचना केल्या.

चारपदरी महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी हा मार्ग मे महिन्यात पूर्ण करण्यात येऊन वाहतुकीसाठी तो खुला केला होता. काही दिवसांपूर्वी या मार्गाला तडे गेल्याचे दिसत होते. पण, त्याकडे कुणी गांभीर्याने पाहिले नव्‍हते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर गस्तीला घालणाऱ्या पोलिसांना महामार्ग कोसळून भगदाड पडल्याचे दिसले. त्‍यानंतर त्‍यांनी त्‍वरित पेडणे पोलिस स्‍थानकात याबाबतची माहिती दिली. तिथे वाहतूक पोलिस तैनात केला व वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली.

महामार्ग कोसळल्याची माहिती मिळाल्यावर राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उमेश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता मनोहर काळे, कार्यकारी अभियंते नारायण मयेकर व फिलिप ग्राव, आर्किटेक्‍ट माधव कामत यांच्‍यासह अन्‍य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

गेल्‍या वर्षीही घडला होता प्रकार
तेरेखोल नदीच्या पात्रात चारपदरी मार्गासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत व मार्गाची सगळी माती कोसळून सुमारे पंचवीस मीटर अंतरापर्यंत लांबीचे व तितकेच खोल अंतराचे भगदाड पडले. गेल्या वर्षी पावसाळ्यात सुमारे ८० मीटरच्या अंतरावर चारपदरी मार्गाचा भाग अशाच प्रकारे नदीत कोसळला होता. या मार्गाचे आर्किटेक्‍ट म्हणून काम करणारे माधव कामत यांनी गेल्यावर्षी कोसळलेल्‍या भागाची व नदी पात्राची पाहणी केली होती. त्यावेळी नदकिनाऱ्याजवळ नदीचे पात्र बरेच खोल झाल्याचे त्याना आढळले होते. आज उपमुख्यमंत्री आजगावकर हे त्यांचाबरोबर चर्चा करत असताना श्री. कामत यांनी नदीच्या काठाजवळचा भाग खोल झाल्याने अशी स्‍थिती निर्माण झाल्याचे सांगितले.

जलवाहिनीही तुटली
महामार्ग वाहून गेल्‍यामुळे तेथील जलवाहिनी तुटली. त्‍यामुळे उगवे, तांबोसे, तोर्से, मोप, पत्रादेवी आदी गावांचा पाणीपुरवठा बंद झाला.
उगवे येथे नदीकिनारी शेती बागायती नदीच्या पात्रात कोसळत असलेले शेतकरी बागायतदार आले होते. त्यांनी आमच्या शेती बागायतीप्रमाणेच बेसुमार रेती उत्खनामुळेच हा मार्ग कोसळल्याचे सांगितले. तर राष्‍ट्रवादी काँग्रेसचे संजय बर्डे यांनी, माजी पंचायत सदस्य गजानन गडेकर व काही नागरिकांनी रस्‍त्‍याच्‍या कामासंदर्भात आक्षेप घेतला. पावसाळ्यात डोंगरावरील पावसाचे पाणी रस्त्यावर मुरते तसेच नदीचा विचार लक्षात न घेता, बांधकामासाठी स्टील रॉडचा वापर न केल्याने हा रस्ता कोसळला, असे सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोसळलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सूचना केल्या.

रेल्‍वे पुलालाही धोका?
तेरेखोल नदीपात्रालगत असलेल्‍या महामार्गाचे विस्‍तारीकरण करताना संरक्षक भिंत उभारण्‍यात आली. ही भिंत उन्‍मळून पडून महामार्ग २५ मीटरपर्यंत खचून भगदाड पडले. तर काही ठिकाणी तडे गेल्‍याने येथील रस्‍ता असुरक्षित बनला आहे. भगदाड पडण्‍याचा प्रकार वाढला, तर काही अंतरावर असलेल्‍या रेल्‍वे पुलालाही धोका संभवतो. येथील पात्र विस्‍तीर्ण झाल्‍याने आधीच धोका पोहोचलेल्‍या रेल्‍वेला पुलाला आता भगदाड पडल्‍याने धोका संभवत आहे. वेळीच तातडीने उपाययोजना करणे आवश्‍‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT