Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: पेडणे ते काणकोण अर्ध्या तासात! दक्षिण - उत्तर गोवा जलद रेल्वे सेवा सुरु करण्याची सरकारची योजना

Goa Assembly Session 2025: करमळी येथे अनेक रेल्वे थांबवल्या गेल्या पाहिजेत. तेथे जलद रेल्वे थांबवण्यासाठी नेवरा येथे क्रॉसिंग स्टेशनची गरज आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : राज्यातील रस्त्यावरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी पेडणे ते काणकोण अर्ध्या तासात पोचणारी रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मये, नेवरा आणि सारझोरा येथील रेल्वे स्थानकांची गरज असल्याची भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (२४ मार्च) विधानसभेत घेतली.

या स्थानकांविषयी सरकारची भूमिका काय अशी विचारणा प्रश्नोत्तर तासाला सातआंद्रचे आमदार वीरेश बोरकर यांनी केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, नेवरा येथे केवळ क्रॉसिंग रेल्वे स्थानक येणार आहे. वास्तविक पाहता आमदार बोरकर यांनी करमळी रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या थांबवाव्यात अशी मागणी करायला हवी होती. रेल्वे मंत्र्यांशी मी याबाबत सविस्तर बोललेलो आहे. करमळी येथून वीस मिनिटात पणजीत पोहचता येते. त्यामुळे करमळी येथे अनेक रेल्वे थांबवल्या गेल्या पाहिजेत. तेथे जलद रेल्वे थांबवण्यासाठी नेवरा येथे क्रॉसिंग स्टेशनची गरज आहे.

मूळ प्रश्न विचारताना बोरकर म्हणाले, विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात याविषयी सरकारने समाधानकारक उत्तर दिलेले नाही. १९९८ मध्ये कोकण रेल्वेची नऊ स्थानके होते. लोलये स्थानक नंतर सुरू करण्यात आले. आता आणखीन तीन स्थानकांची गरज आहे असे म्हटले जाते. ही गरज लक्षात येण्यासाठी कोणते सर्वेक्षण, कोणता अभ्यास कधी, कुठे, केला याची माहिती सरकारने द्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे स्थानकांना पुरेसे प्रवासी आहेत का? हे सरकारने सांगावे.

नेवरा स्थानक नसल्याने करमळी ते मडगाव या टप्प्यात एक तासाचा उशीर होतो असे जे सरकार सांगते ते पाहता रेल्वे सायकलच्या वेगाने चालते काय अशी विचारणा करावीशी वाटते. आता नेवरा येथे रेल्वे स्थानकाचे काम चालू आहे.

खाजन जमिनीत रेलस्थानक नको!

वेळ्ळीचे आमदार कुझ सिल्वा यांनी प्रस्तावित रेल्वे स्थानक हे सां जुझे द आरियल की सारझोरा येथे येणार आहे, अशी विचारणा केली. आज क्रॉसिंग रेल्वे स्थानके असलेल्या ठिकाणी भविष्यात प्रवासी रेल्वे स्थानके होतील, असे कोकण रेल्वेनेच म्हटल्याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. खाजन जमिनीत रेल्वे स्थानके नकोत, अशी भूमिका त्यांनी विशद केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live Updates: डिचोली हादरले! बाजार परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय

AFC Champions League 2: एफसी गोवाचा कडू शेवट! 2025 चे मैदान पराभवाने गाजले; आता भारतीय फुटबॉलचे भविष्यही अधांतरी

Vasco Market: मुरगाव पालिकेच्या नियमांना हरताळ, वास्को मार्केट बनलं 'अडथळ्यांचं आगर'; कारवाईच्या इशाऱ्यानंतरही विक्रेत्यांची दादागिरी सुरुच

Dabolim Airport Touts: गुपचूप प्लॅन, धडाकेबाज ॲक्शन! दाबोळी विमानतळावर 20 दलालांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पळणाऱ्यांची धरपकड सुरु

Goa Shellfish Shortage: बेतूलच्या मच्छीमारांवर उपासमारीची टांगती तलवार! साळ नदीतील गाळ ठरतोय 'शेल फिश'साठी कर्दनकाळ

SCROLL FOR NEXT