Goa Diabetes Epidemic Dainik Gomantak
गोवा

Goa Diabetes Epidemic: धक्कादायक! राज्यात दर चौघांमागे एकाला मधुमेह; 26.4 टक्क्यांहून अधिक गोमंतकीयांना आजाराची लागण

Diabetes Epidemic: मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ असे संबोधले जाते, कारण मधुमेहाची काहीवेळा लक्षणे आढळत नाहीत. त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Manish Jadhav

पणजी: मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ असे संबोधले जाते, कारण मधुमेहाची काहीवेळा लक्षणे आढळत नाहीत. त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गोव्यात 26.4 टक्यांहून अधिक नागरिकांना मधुमेह आहे, तर 20.3 टक्क्यांहून अधिक नागरिक असे आहेत ज्यात मधुमेहपूर्व लक्षणे आढळून येतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी पोषक आहार, व्यायाम आणि मेडिटेशन या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे आरोग्य संचालक डॉ. वंदना धुमे यांनी सांगितले.

मधुमेहाविरुद्धची लढाई

डॉ. धुमे यांनी सांगितले की, मधुमेहाची ही लढाई जिंकायची असेल तर आपण एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबात मधुमेह झालेला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने आरोग्याच्या त्रिसूत्रीचे पालन करावेच. परंतु त्या कुटुंबाला समाजाचे सहकार्य देखील महत्त्वाचे असल्याचे आहे. आरोग्य संचालनालयाच्या माध्यमातून मधुमेहाला आळा बसवा, यासाठी योग्य ते उपाय केले जात आहेत. राज्यातील सर्व प्राथमिक, शहरी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मधुमेहावर मोफत इलाज केला जातो. इन्शुलिन मोफत पुरवले जाते. मधुमेह मुक्त जीवनशैली हे आपले लक्ष आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे, योग्य आहार आणि वेळेत उपचार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्रिसूत्रीचे पालन करावे ...

‘टूर डी डायबिटीज’ या चार शहरांच्या दौऱ्याला पणजीतून सुरवात झाली. त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. टाइप वन मधुमहासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दौरा केला जाईल. मधुमेह आणि संपूर्ण भारतातील चांगल्या आरोग्यासाठी प्रचार होणार आहे. मुंबई, दिल्ली मार्गी होऊन अखेर बंगळूरमध्ये हा दौरा संपुष्टात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

Cash For Job Scam: सरकारी नोकऱ्यांची विक्री म्हणजे गोव्याला झालेले 'गँगरीन'; आता 'बड्या' माशांचे काय? संपादकीय

Cash For Job Scam: सागर नाईकविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद; 10 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT