GMC  Dainik Gomantak
गोवा

GMC Admission News: गोवा मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर प्रवेशावरील स्थगिती गोवा खंडपीठाने उठवली...

वेळापत्रकानुसार होणार प्रवेश प्रक्रिया

गोमंतक ऑनलाईन टीम

GMC Admission News: गोवा मेडिकल कॉलेजमधील आरक्षणानुसार झालेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरील स्थगिती गोवा खंडपीठाने उठवली. आता प्रवेश प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल. याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी आता 4 सप्टेंबर रोजी होईल.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण ठेवण्याच्या गोवा सरकारच्या अधिसूचनेला वैद्यकीय पदवी विद्यार्थ्यांनी आव्हान दिले आहे.

मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली होती.. वैद्यकीय पदवीधर विद्यार्थी मोहनिश अरुण सरदेसाई याच्यासह 68 विद्यार्थ्यांनी ही आव्हान याचिका सादर केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण ठेवण्याचा सरकारने 5 मे 2023 रोजी घेतला होता.

या अभ्यासक्रमासाठी आरक्षण देण्यासाठी समाजकल्याण खात्याने रोस्टर तयार केलेला नाही. या अभ्यासक्रमासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षणासाठी ठेवल्यास सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, याची भीती आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT