आगशी: वारसा हीच आपली खरी संपत्ती असून ती जतन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन लढले पाहिजे. आज गोवा सरकार दिवाळखोरत आल्याचे भासवून मोठ्या उद्योगपतींना राज्य विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे.
(Heritage sites are the real wealth of Goa)
त्यासाठी गोमंतकीयांनी जागृत होऊन, नदी, डोंगर आणि वारसा स्थळे जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
नेवरा येथे सरकारी प्राथमिक शाळेच्या परिसरात डॉ. बर्नार्ड पेरेस डिसिल्वा (बीपीएस) यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या माहिती फलकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर, इतिहास प्राध्यापक प्रजल साखरदांडे, आजमाने शाळेचे मुख्याध्यापक दिनेश सांतिनेजकर, आजोशी - मंडूरचे माजी सरपंच अजित बकाल, श्री धोंडेश्वर देवस्थान नेवरा मंदिराचे पुरोहित कुमार देसाई उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.