Baga |Helicopter Landing Dainik Gomantak
गोवा

Baga: बागा येथे वाहनतळावर उतरले हेलिकॉप्टर !

बागा-कळंगुट येथील गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वाहन पार्किंगस्थळी एक खासगी हेलिकॉप्टर उतरवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Baga: बागा-कळंगुट येथील गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वाहन पार्किंगस्थळी एक खासगी हेलिकॉप्टर उतरवण्यात आले.  मात्र, हे हेलिकॉप्टर कुठून आले, याचा उलघडा होऊ शकला नाही. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.12) दुपारी घडला. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या वाहनतळापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आग्वाद-सिकेरी या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी खास हेलिपॅड आहे. कोणतेही विशेष असे कारण नसताना या सार्वजनिक पार्किंगतळी हेलिकॉप्टर उतरवण्याची परिस्थिती का निर्माण झाली?, याविषयी चर्चा होत आहे.

या बागा पार्किंगस्थळी पे-पार्किंग शुल्क घेण्यासाठी जीटीडीसीकडून कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. असे असतानाही परस्पररित्या हेलिपॅडची निर्मिती केल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT