Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Red Alert In Goa: जोर वाढणार, गोव्यात धो... धो... बरसणार; राज्याला तीन दिवस 'रेड अलर्ट'

IMD Goa Rain Alert: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरुच आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. राज्यात पडझडीच्या घटना सुरुच आहेत.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने आजपासून तीन दिवस रेड तर त्या पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गोव्यात पाऊस अजून धो ..धो.. बरसणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात आजपासून (२३ मे) २५ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, २६ आणि २७ मे या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, २८ आणि २९ मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पुढील सात दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शुक्रवारी (२३ मे) राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, या काळात ५० ते ६० किलो मीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरुच आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. राज्यात पडझडीच्या घटना सुरुच आहेत. विविध ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले. दरम्यान, पुढील तीन दिवस रेड अलर्ट दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT