Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पावसाचे जोरदार पुनरागमन; दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

सतर्कतेचा इशारा अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जूनच्या सुरवातीच्या काही दिवसांत ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारपासून जोर धरला आहे.

आज सकाळपासून राज्यभर मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) इशारा हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. फोंड्यात कारवर झाड पडल्याची घटना घडली.

मॉन्सूनच्या आगमनानंतर गेल्या आठ-दहा दिवसांत अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मागील चार-पाच दिवसांपासून तर हलक्या सरीदेखील थांबल्या होत्या,

परंतु आता पुन्हा मौसमी पाऊस सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२६ जूनपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे हवामान खात्याद्वारे जाहीर केले आहे. गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ५० ते ५५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४७.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, समता नगर, खोर्ली-म्हापसा येथे रस्ता खचल्याने रस्त्याची संरक्षक भिंत झाडासह घरावर कोसळली. यात एक दुचाकी या संरक्षक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली. ही घटना, शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.

सांगेत सर्वाधिक; २४ तासांत ४ इंच

गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १०२ मि.मी. म्हणजेच ४ इंच पाऊस बरसला असून मॉन्सूनच्या आगमनानंतर पहिल्यांदाच सांगेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.

सांगेनंतर फोंडा, म्हापसा, केपे, पेडणे, वाळपई, साखळी, मुरगाव, मडगाव तसेच राज्यातील इतर भागांत आज मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. परंतु राज्यात अजून ६४ टक्के पावसाची कमतरता आहे.

राज्यात कुठे काय घडले?

फोंडा : रस्त्यांवर, घरांत, दुकानांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. कारवर झाड कोसळले.

सांगे : वादळ व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली.

काणकोण : वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

सत्तरी : नऊ ठिकाणी झाडांची पडझड, वाळपई अग्निशमन दलातर्फे मदत कार्य.

बार्देश : चार ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना. म्हापशात तीन झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत व्यत्यय.

बळीराजा सुखावला : राज्यात आज कोसळलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा व जनता सुखावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात रोपांना पाणी देणे सुरू केले होते, तर काही ठिकाणी भात रोपे सुकण्यास सुरवात झाली होती.

राज्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. तसेच धरणांनी तळ गाठला आहे, परंतु पुढील काही दिवसांत अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसल्यास ही चिंता दूर होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT