Heavy Rain Destroyes Rice Farming Dainik Gomantak
गोवा

Bardez: अतिवृष्टीमुळे बार्देशात भातशेतीचे ६९ लाखांचे नुकसान; ९५० भरपाई अर्ज

Bardez Rain: जवळपास २५० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे; सर्व्हे करण्यास सुरवात

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: मुसळधार पावसामुळे बार्देशातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

आतापर्यंत बार्देश विभागीय कृषी कार्यालयाजवळ ९५० बाधितांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले असून, ही हानी ६९ लाख रुपयांपर्यंत गेली आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. जवळपास २५० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी.

सर्व्हे करण्यास सुरवात

कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, बार्देशात मुसळधार पावसामुळे भातशेतीला फटका बसला आहे. आतापर्यंत ९५० जणांनी विभागाकडे भरपाईसंदर्भात अर्ज केले आहेत. आम्ही सर्व्हे करण्यास सुरवात केली असून, नुकसानीचा हा आकडा अंदाजे ५९ लाखांपर्यंत गेला आहे. अजूनही अर्ज येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

SCROLL FOR NEXT