Bicholim Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: ..पुन्हा 'अवकाळी'चा कहर! भातपीक आडवे; बागायती पिकांचे मोठे नुकसान

Bicholim Rice Farming: मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातल्याने भातशेती तसेच बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Heavy Rain Destroyed Rice Farming In Goa Bicholim

डिचोली: मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी अवकाळी पावसाने गुरुवारी पुन्हा धुमाकूळ घातल्याने भातशेती तसेच बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गुरुवारी रात्री उशिरा पावसाने जोरदार धडक दिली. तालुक्यातील सर्व भागात पाऊस पडला. या पावसाच्या तडाख्यात कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेतीचे मोठे नुकसान झाले. बोर्डेसह अन्य काही भागात भातशेती आडवी झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता पुन्हा एकदा वाढली आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाची झोप उडाली आहे. दरम्यान, हार्वेस्टिंग यंत्राच्या अनुपलब्धतेमुळे बोर्डे आदी काही भागातील भातशेतीची कापणी आणि मळणी लांबणीवर पडल्याचे कळते.

बळीराजाची झोप उडाली

दिवाळीच्या तोंडावर कहर केलेल्या पावसाने गेल्या दहा-बारा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांत पिळगाव, मये आदी भागात भात कापणी, मळणी आदी काम जोरात सुरू होती. बहुतेक शेकऱ्यांनी पिकलेले भात शेतातून घरी नेले आहे. मात्र बोर्डेसह काही भागात भातपिकाची अजून कापणी झालेली नाही. गुरुवारी रात्री पडलेल्या पावसाचा तडाखा या भातशेतीला बसला.

हार्वेस्टिंग यंत्र अनुपलब्ध

डिचोलीतील बहुतेक भागात भातपिकाची कापणी आणि मळणीची कामे पूर्ण झाली असली तरी बोर्डेसह अन्य काही भागात ही कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत. हार्वेस्टिंग यंत्र उपलब्ध होत नसल्याने कापणी आणि मळणीची कामे लांबणीवर पडली आहेत, अशी माहिती बोर्डे येथील एक शेतकरी नामदेव गोसावी यांनी दिली. कृषी खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गोसावी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. पुन्हा पावसाने कहर केला, तर उरलेसुरलेले भातपीक मातीमोल होऊन हातातोंडाशी आलेला घास आणि मेहनतही वाया जाणार, अशी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT