Goa Bicholim Rain Damage Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: पावसाच्या तडाख्यामुळे डिचोलीत लाखोंचे नुकसान

Goa Rain: मये येथे घरावर, तर नार्वे येथे स्वच्छतागृहावर कोसळले मोठे झाड

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पावसाचा जोर कायम असून डिचोली तालुक्यात चार ठिकाणी पडझड झाली. मये येथे वीजवाहिन्या तोडून एक झाड घरावर कोसळले. तसेच नार्वे येथील स्वच्छतागृहावर झाड पडले. या पडझडीत घरमालक व वीज खात्याचे मिळून तीन लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

पावसाच्या तडाख्यात दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास केळबायवाडा, मये येथे विठू पांडुरंग वाडकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. झाड कोसळताना विद्युतवाहिन्याही तुटल्या. या पडझडीत घराची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन एक लाखापेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले.

मात्र जीवितहानीसारखा अनर्थ टळला. अन्य एका घटनेत मुड्डेर, नार्वे येथे वीजवाहिन्या तोडून फणसाचे झाड स्वच्छतागृहावर कोसळले. सकाळी एका घटनेत वाठादेव-व्हावटी येथे तर अन्य एका घटनेत कुडचिरे येथे वीजवाहिन्या तोडून रानटी झाड रस्त्यावर कोसळले.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनांची माहिती मिळताच लिडींग फायर फायटर साईनाथ केसरकर, विठ्ठल गाड आणि शिवाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी मदतकार्य केले.

चालक ऑपरेटर गौरीश मांद्रेकर आणि रामदास परब यांच्यासह रावजीराव राणे, योगेश नाईक, महेश देसाई, प्रवीण गावकर, हर्षद सावंत आणि प्रदेश मोहन या जवानांनी मदतकार्य करून अडथळे दूर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..मोबाईल कमी वापर'! आई ओरडली; 12 वर्षांची मुलगी दिल्लीच्या ट्रेनमध्ये चढली; घर सोडून गेलेली गोव्यातील 3 मुले सापडली उत्तर भारतात

Goa Government Job: गोव्यातील तरुणांसाठी खूशखबर! 8 हजार सरकारी पदे भरली जाणार; मोठी रोजगारसंधी

IFFI 2025: 'क्या रे भिडू, सब कुछ ठिक है ना...'! ‘रेड कार्पेट’वर जॅकीदांची हटके एंट्री; कमल हसन, मनोज वाजपेयीला पाहून चाहते खूश Video

Goa New Cricket Captain: गोवा T20 संघात मोठा बदल! हुकमी 'सुयश'कडे नेतृत्वाची धुरा; नवीन संघात कुणाला स्थान? पहा..

Baina Theft: 'पोलिसांनी शोधले असते तर, चोर सापडले असते'! बायणा दरोड्यातील जखमीचा धक्कादायक खुलासा; सांगितला संपूर्ण थरार

SCROLL FOR NEXT