Heavy rainfall lashes Bicholim  Dainik Gomantak
गोवा

अवकाळी पावसामुळे डिचोलीत झाडांची पडझड, घरांचे नुकसान

पावसामुळे हजारोंची वित्तहानी

दैनिक गोमन्तक

डिचोली : बुधवारी सायंकाळी डिचोली शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची वृष्टी झाली. पावसावेळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे डिचोली शहरासह अनेक भागात दाणादाण उडाली. झाडांची पडझड होताना मयेसह (mayem) दोनठिकाणी घरांवर झाडे कोसळली. डिचोलीच्या साप्ताहिक बाजारावरही परिणाम झाला. सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. साधारण पाऊण तास पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे रस्त्यावर पाणी झाले. बहूतेक भागात वीज (power) पुरवठाही खंडित झाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काही भागात काळोखाचे साम्राज्य पसरले होते. पावसामुळे हजारो रुपयांची वित्तहानी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

घरावर झाड कोसळले

आजच्या पावसावेळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यात विविध ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे. चिंच भटवाडी-मये येथे सत्यवान पेडणेकर यांच्या घरावर भलामोठा आम्रवृक्ष कोसळल्याने घराची मोडतोड झाली. या घटनेत पेडणेकर यांची हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या एका घटनेत पुनर्वसन वसाहत-साळ येथे एका घरावर माड कोसळला. डिचोली (Bicholim) अग्निशमन दलाला या घटनांची माहिती मिळताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशीरापर्यंत मदतकार्य चालू होते. अन्य घटनेत बोर्डे येथे लोकवस्तीत माड तर काही ठिकाणी झाडांच्या फ़ांद्याची पडझड झाल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

SCROLL FOR NEXT