Dainik Gomantak
गोवा

Sattari Flood: सत्तरीत हाहाकार! घरे, दुकानांत घुसले पाणी; वीज खांब उखडून वीज वाहिन्याही तुटल्या

Goa Monsoon: विविध ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने तसेच झाडांची पडझडही झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2024|Sattari Rain

वाळपई/पिसुर्ले: बऱ्याच दिवसांची उसंत घेतलेला पाऊस सोमवारी दुपारी अचानक आपले रौद्ररूप धारण करून तासभर संततधार कोसळल्याने सत्तरी तालुक्यातील वाळपई, होंडा भागात हाःहाकार माजला. विविध ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने तसेच चोर्लाघाट मार्गासह विविध रस्त्यांवर झाडांची पडझडही झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागला.

वाळपई हनुमान मंदिर परिसरातील शेडवजा दुकानांमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे साहित्य वाहून गेल्याने नुकसान झाले. शिवाय म्हादई, रगाडा, वेळूस नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली.

वडदेव नगर, होंडा तिस्क, नवनाथ मंदिर परिसरात ओहोळाच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वत्र पूरस्थिती उद्‍भवली. होंडा तिस्क येथिल स्टेट बँक, नवनाथ मंदिर तसेच वडदेव नगर भागातील काहीजणांच्या घरात पाणी शिरले. चतुर्थीच्या तोंडावर कोसळणाऱ्या पावसामुळे होंडा परिसरात चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे दोन तासांत या भागातील नाले तसेच ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती उद्‍भवली होती. होंडा तिस्क येथील स्टेट बँकेच्या शाखेत पाणी शिरल्याने, ग्राहक तसेच बॅंक अधिकाऱ्यांची धांदल उडाली. तसेच होंडा आयडीसी लगतच्या नवनाथ मंदिरात ओहोळातील पाणी शिरले. मंदिरात किती हानी झाली, याचा तपशील मिळू शकला नाही.

होंडा वडदेव नगर येथील सखल भागातील घरांत पाणी शिरून, वाड्यावर जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला तर काहीजणांच्या अंगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. तर रस्ता पाण्याखाली गेल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले.

वीजखांब, झाडांची पडझड; बत्ती गुल

चोर्ला घाट परिसरात रस्त्यावर झाड पडण्याची घटना घडली तसेच बाजारण सत्तरी येथे रस्त्यावर व वीज तारांवर भले मोठे झाड उन्मळून पडल्यामुळे वीज तारा तसेच ४ वीज खांब उखडून वीज वाहिन्याही तुटल्याने वीजपुरवठाही काहीकाळ खंडित  झाली. शिवाय वीज खात्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर बाराजण परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. या वाळपई वाळपई अग्निशमन दलातर्फे घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्यात आली. तसेच वीज कर्मचाऱ्यांनी काहीवेळाने वीज पुरवठा सुरळीत केला.

वाहनांची गर्दी; खड्ड्यांचा अडसर

सध्या चतुर्थीचे  दिवस जवळ आल्याने वाळपई भागात वाहनांची मोठी गर्दी असते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते आहे. वाळपई पणजी मार्ग, वाळपई ठाणे मार्ग या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला गाड्या पार्क करून ठेवल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे वाळपई पालिकेने यासंबंधी उपाय योजना करावी,अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT